cold snap will continue till end of January sakal
जळगाव

थंडीचा कडाका जानेवारीअखेर कायम राहणार

हवामान विभागाचा अंदाज : जम्मू काश्‍मीर, हिमाचल प्रदेशातील हिमवृष्टीचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जानेवारीच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात सुरू असलेला थंडीचा कडाका जानेवारी अखेरपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जम्मू काश्‍मीर(Jammu and Kashmir), हिमाचल प्रदेशात(Himachal Pradesh) होत असलेल्या हिमवृष्टीचा परिणाम म्हणून खानदेशात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीच्या कडाक्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून सर्दी, खोकला, अंगदुखी आदींमुळे नागरिक त्रस्त आहे.

हिमाचल प्रदेश, जम्मू काश्‍मीरमध्ये हिमवृष्टीने गार वारे वाहू लागले आहे. त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात वाहणाऱ्या वाऱ्यावर होऊन सकाळी व रात्री शितलहरी वाहू लागतात. हवेतील गारव्याचा विपरीत परिणाम शरीरावर होत असून नागरिकांना व्याधी जडू लागल्या आहेत. ज्येष्ठांना २४ तास गरम कपडे घालावे लागत आहे. इतरांनाही पायदुखी, कंबरदुखी, अंगदुखी, डोकेदुखी अशा व्याधी सुरू झाल्या आहेत. काहींना तापही येत आहे. सध्या कोरोनाचे वातावरण आहे. गार वातावरणात बहुतेकांना सर्दी खोकला, ताप, अंगदुखी असे लक्षणे असल्याने ते कोरोनाची चाचणी ऐवजी फॅमिली डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करून घेत आहे.

जिल्ह्यातील तापमान २१ जानेवारीपर्यंत किमान १३ ते १५ अंशापर्यंत राहणार आहे. दुपारी मात्र उन्हाचा कडाका जाणवेल. सायंकाळी पुन्हा तापमानात घट होईल, असे चित्र असणार आहे. जोपर्यंत हिमाचलप्रदेशातील गार वारे वाहणे बंद होत नाही, तोपर्यंत अशीच स्थिती जिल्ह्यातील वातावरणाची राहिल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ निलेश गोरे यांनी दिली.

अतिवृष्टीचा परिणाम नाही

यंदा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. सरासरी पावसाने शंभरी ओलांडून १२० टक्क्यांपर्यंत मजल गाठली असल्याने थंडीचा कडाका वाढला असे अनुभवी नागरिक सांगतात. मात्र हवामान विभागाच्या मतानुसार तसे चित्र नाही. हिमाचल प्रदेशातील शितलहरीमुळे थंडीचा कडाका वाढला असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसातील तापमान असे

तारीख- कमाल- किमान (अंश)

  • १४ जानेवारी - २७ - १६

  • १५ जानेवारी - २८ - १५

  • १६ जानेवारी - २७ - १४

  • १७--जानेवारी - २८ - १५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियापासून आंदोलनापर्यंत... जेन-झी 'Vasteguna Huiya'च का म्हणतायत? हा ट्रेंड नेमका सुरू कसा झाला? वाचा Inside Story...

Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर

Raigad Flood: भेरव अंबा नदीचा पूल पाण्याखाली; रायगडमधील आदिवासी गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

Yoga Benefits: योगामुळे तंबाखू सोडण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढली; एम्सच्या संशोधनातून मोठा खुलासा!

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

SCROLL FOR NEXT