District Collector Ayush Prasad while giving instructions in the review meeting of various social justice committees. esakal
जळगाव

Jalgaon News : ‘वंचित’ घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्यात येते. वंचित घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर सामाजिक सलोखा टिकून राहातो.

सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी क्षेत्रीय स्तरावर समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. १५) येथे दिल्या.

महाबळ कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समाजकल्याण विभागाच्या विविध विषय समित्यांच्या जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. (Collector Prasad orders to Effective implementation of schemes for underprivileged sections jalgaon news )

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. लोखंडे, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे, विविध विभागातील विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाशी संबंधित असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जिल्हा दक्षता समिती, रमाई घरकुल योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, शासकीय वसतिगृह निरीक्षण समिती, ज्येष्ठ नागरिक संनियंत्रण समिती, प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या विषय समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या.

श्री. प्रसाद म्हणाले, की सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. पोलिस प्रशासनाने ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात पोलिस तपासावरील गुन्ह्यांचा तत्काळ तपास करून चार्जसीट दाखल करण्याची जलद कार्यवाही करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सार्वजनिक बांधकाम विभागाने अमळनेर शासकीय वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करून ऑक्टोबर २०२३ पर्यंत ताब्यात देऊन नोव्हेंबर २०२३ पर्यंत उद्‍घाटन होईल यादृष्टीने तयारी करावी. प्रधानमंत्री आदर्श ग्रामविकास योजनेचे प्राप्त प्रस्ताव व कामाचा अर्थसंकल्प चार दिवसांत सादर करावा. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

पुष्पगुच्छऐवजी पुस्तक भेट

जिल्ह्यात होणाऱ्या शासकीय बैठका, कार्यक्रमात स्वागतासाठी हारतुरे, पुष्पगुच्छ न देता पुस्तक भेट म्हणून देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रसाद यांनी काढले आहेत‌. या निर्देशानंतर समाजकल्याण विभागाची ही पहिलीच बैठक होती.

या बैठकीत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा’ ही कादंबरी भेट म्हणून दिली. त्यामुळे जिल्ह्यातील या उपक्रमास सुरवात झाली. भेट म्हणून मिळालेले पुस्तक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा ग्रंथालयाकडे सुपूर्द केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

SCROLL FOR NEXT