Collector Ayush Prasad while guiding in the agricultural fair organized on behalf of the market committee.  esakal
जळगाव

Jalgaon District Collector : केळी महामंडळासाठी जागा निश्‍चितीचा प्रस्ताव तयार : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon District Collector : केळी महामंडळासाठी जळगावच्या कृषी विद्यापीठ परिसरात जागा निश्चित करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला असून, लवकरच महामंडळाच्या कामाला सुरुवात होईल.

जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी निर्यातक्षमकेळी उत्पादनाबरोबरच पॅकेजिंग, ग्रेडिंग, ट्रान्सपोर्टेशन आणि जागतिक बाजारपेठेतील भावाचा अभ्यास या चतु:सूत्रीकडे लक्ष देण्याची गरज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली. (Collector Prasad statement about Proposal for location of banana corporation jalgaon news)

येथील बाजार समितीच्यावतीने आयोजित कृषी मेळाव्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री. प्रसाद म्हणाले की, मागील जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केळी महामंडळ, बाजारभाव, निर्यात वाढ, अपेडा या संस्थेकडून कोल्ड स्टोरेज याबाबत जी आश्वासने दिली ती आपण पूर्ण करू.

श्री. प्रसाद आणि जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी बाजार समितीचे आवारातील विविध कृषी विषयक स्टॉलला भेटी देऊन माहिती घेतली.

या वेळी बोलताना उपेश पाटील यांनी सांगितले, की जिल्ह्यातील केळी दर्जेदार आणि निर्यातक्षम असली आणि केळीला जी आय मानांकन मिळाले असले तरीही त्याचा फायदा येथील शेतकरी घेत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. डख यांनी सविस्तर मार्गदर्शनात पाऊस केव्हा पडतो किंवा केव्हा लांबतो याबाबतची आपली निरीक्षणे सादर करून या अंदाजानुसार शेती कामांचे नियोजन करण्याचे आवाहन केले.

प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार बी. ए. कापसे, उद्योजक श्रीराम पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्तविक बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी केले. सभापती झाल्यानंतरच्या अल्पकाळात बाजार समितीने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी दिली.

स्फूर्ती योजनेचे तांत्रिक सल्लागार मिलिंद पाटील यांनीही मार्गदर्शन केले. बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, संचालक डॉ. राजेंद्र पाटील,योगीराज पाटील, गणेश महाजन, राजेंद्र चौधरी, पांडुरंग पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर अ‍ॅड. उज्ज्वल निकमांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी सूचित केलं आणि...'

Nitin Gadkari : भाजपाला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं....

Chhagan Bhujbal : भुजबळांचा गौप्यस्फोट: जिल्हा बँक अडचणीत आणणारेच निवडणुकीच्या मैदानात

आता संभ्रम नको...राजकीय युती गरजेचीच! संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका, मुखपत्रातून मनसेला घातलीये 'ही' साद

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला उद्या पृथ्वीवर परतणार! भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण, कुठे पाहाल लँडींग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT