sakal
जळगाव

Jalgaon News : जळगावची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मागील महिन्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १८३२ मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स आणि सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या लक्ष केंद्रित प्रयत्नांमुळे एका महिन्यात अशा गंभीर कुपोषित बालकांची संख्या ४१० ने घटली आहे.

ही संख्या आत्ता १४२२ झाली आहे. जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्ती कडे सुरू झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. (Collector Prasad statement Jalgaon progress towards malnutrition news)

जिल्हा प्रशासनाने कुपोषण मुक्तीसाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्याने मेडीकल , सर्जीकल अॅण्ड डायर्टी (एमएसडी) तीन प्रकारच्या संकल्पना वापरण्यात आल्या.

यामध्ये मुलांना एनर्जी नेस्ट न्यूट्रीशन फूड, २२०० अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली. पोषण पुनर्वसन केंद्रात बालकांच्या प्रवेशाचे प्रमाण वाढविले. हृदयात छेद असलेल्या मुलांच्या शोधासाठी मोहीम राबविली. त्यामुळे शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले. लसीकरण व औषध वाटपावर भर देण्यात आला.

सप्टेंबर २०२३ महिन्यात भारत सरकारच्या सूचनेनुसार पोषण माह मोहीम राबविण्यात आली. पोषण माहात जळगाव जिल्ह्यातील ३२ लाख लोकांपर्यंत आम्ही पोहचलो. यामध्ये जेवण कसे तयार करायचे, रानभाजीचा वापर कसा करायचा, उपलब्ध संसाधनांचा वापर कसा करायचा याबाबत जनजागृती करण्यात आली.

जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, आशा वर्कर्स, वैद्यकीय अधिकारी या सर्वांनी सांघिक मेहनत घेतली. जिल्हाधिकारी म्हणून मी स्वतः सहा तालुक्यात भेट दिली. याचा एकत्रित परिणाम म्हणून आज कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मध्यम कुपोषित ८०० ने कमी

अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या ४१० ने कमी झाली आहे. तर मॅम (मध्यम कुपोषित) बालकांची संख्या सुमारे आठशेने कमी झाली आहे. म्हणजे एक हजारापेक्षा जास्त मुलांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे.

इतर मुलांच्या ही आरोग्यात सुधारणा झाली आहे मात्र ते अद्याप कुपोषणाच्या बाहेर निघालेले नाहीत. हे बालक ही लवकरच कुपोषण मुक्त होतील. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत जळगाव जिल्हा कुपोषण मुक्त निश्चित होणार असल्याची आशा जिल्हाधिकारी प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: मुलाने दिला लढा, सरकार झुकलं; आईच्या एका वाक्याने अनेकांचे डोळे पाणावले... दिपकेंच्या गावात जल्लोष! Video Viral

IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Pune Crime: पोलिस चौकीत सुरू होता 20 लाखांचा डाव? नऱ्हे दरोड्याचं रहस्य उलगडलं; २ पोलिस अन् तोतया पत्रकार जाळ्यात, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

Latest Marathi News Update : अंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकले, मोदीजी आतातरी देशाकडं लक्ष द्या : उद्धव ठाकरे

ED Action: मुंबईत ईडीची मोठी कारवाई! रंगशारदा हॉटेलसह ३३२ कोटींच्या मालमत्ता जप्त, भूखंडाचाही समावेश

SCROLL FOR NEXT