students protest sakal
जळगाव

जळगाव : तीन आंदोलनांनी गाजले ‘कलेक्ट्रोरेट’

वाहतुकीची कोंडी; अकरावी-बारावीचे विद्यार्थी उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना संसर्गाची तिसरी लाट अद्याप ओसरली नसताना जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता. ३१) चक्क तीन विविध संघटनांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा रद्द करून ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तीन आंदोलनातील आंदोलकांना वेळीच पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच रोखले. मात्र आंदोलनात झालेली गर्दी, कोरोना वाढविणार होती हे मात्र निश्चित.

युवक उतरले रस्त्यावर

दहावी, बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर झालेली आहे. मात्र यंदा सर्वच वर्ग ऑनलाइन झाले आहेत. मग परीक्षा ऑनलाइन का ? या परीक्षाही ऑनलाइन घेण्यात याव्या या मागणीसाठी सोमवारी असंख्य दहावी, बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महाविद्यालयीन युवक झुंडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. तेथे ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइनच घेण्यात याव्यात अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी या युवकांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अडविल्यानंतर अनेकांनी हुल्लडबाजी केली. चित्रविचित्र आवाज काढले. यामुळे या मार्गाने जाणारे वाहनधारकही थांबून आंदोलनाला बघत होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर नेतृत्व नसलेल्या विद्यार्थ्यांनी एकच हुल्लडबाजी केली. यामुळे वाहतुकीस अडथळा व गर्दी वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. विद्यार्थी ऐकत नसल्याने विद्यार्थ्यांना काठीचा धाक दाखविला. अखेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी विद्यार्थ्यांची समजूत घालीत गर्दी वळवली. पोलिसांसोबत जाऊन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. आंदोलनात रोहन महाजन, हर्षल नाथ, प्रशांत खंडाळे, अनिरुद्ध चव्हाण, सुमीत सोनवणे, रोहन प्रजापत,जयेश चौधरी, जियान शेख, हर्षल देवरे, विशाल घोरपडे, आकाश कुंभार, विनोद इंगळे, महेंद्र तायडे यांच्यासह दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होते.

सांगवीच्या संशयितांना अटक करा

मौजे सांगवी (ता. यावल) येथे प्रजासत्ताक दिनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराची घटना घडली. तिला व तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना त्वरित अटक करावी, ती केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावी, त्यात सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी जामनेर तालुका समस्त कोळी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. संशयितांना त्वरित अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा कोळी बांधवांनी दिला. असंख्य कोळी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. संतोष कोळी, प्रकाश बोरसे, ॲड. गणेश सोनवणे, समाधान मोरे, विजय सोनवणे, सुभाष सोनवणे, कैलास सोनवणे, भगवान कोळी, किशोर बाविस्कर, सुनील ठाकरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

वंचित बहुजन आघाडी

येथील तांबापुरा परिसरातील महादेव मंदिर ते शिरसोली नाका परिसरात रस्त्यावर आलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. मात्र येथील अनेक नागरिकांची घरे त्यात जाऊन नागरिक बेघर होत आहे. महापालिकेने संबंधित नागरिकांना पर्यायी जागा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी वंचित बहूजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. शहरात इतर भागातील नागरिकांची अतिक्रमणे हटविताना त्यांना पिंप्राळा, शिवाजीनगर परिसरात पर्यायी जागा दिली. तशी जागा या नागरिकांना देण्याची मागणी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, महासचिव वैभव शिरतुरे, डिगंबर सोनवणे, महानगर प्रमुख दीपक राठोड, डॉ. नारायण अटकोरे, जितेंद्र केदार, गमीर शेख, संजय शिंदे, प्रविण इंगळे आंदोलनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT