Banana esakal
जळगाव

Banana Insurance: विमा कंपनी, सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने; दिवाळीपूर्वी भरपाईचे पोकळ आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा

Banana Insurance : दिवाळीपूर्वीच केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळणार असल्याचे आश्वासन सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दिले असले तरी शुक्रवारी (ता. १०) सायंकाळपर्यंत दिवसभरात तालुक्यातील कोणत्याही उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली नाही. (compensation amount of banana crop insurance has not deposited in bank account of farmers jalgaon news)

अखेर हे आश्वासन केवळ पोकळ आश्वासनच राहिल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपनी आणि सत्ताधाऱ्यांनी पानेच पुसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील ५५ हजार विमा धारक केळी उत्पादक शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीचा हवाला देत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची भरपाई दिवाळी पूर्वीच मिळेल, असे आश्वासन दिले आहे.

व सर्वच प्रसार माध्यमात त्यांचे वक्तव्य प्रसिद्धही झाले आहे. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. आता या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय? शरीरातील 'या' बदलांकडे करू नका दुर्लक्ष

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

SCROLL FOR NEXT