While concretizing in Kavyaratnavali Chowk. esakal
जळगाव

Jalgaon News : जर्मन तंत्रज्ञानाने रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण; 85 कोटींच्या निधीतील कामे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शासनाने मंजूर केलेल्या ८५ कोटींच्या निधीतून प्रमुख रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणास सुरवात झाली आहे. त्याअंतर्गत काव्यरत्नावली चौक ते शिवतीर्थ या सर्वाधिक रहदारीच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण नुकतेच सुरु झाले असून त्यासाठी ‘सिक्स्डफॉर्म’ या जर्मन धर्तीवरील तंत्रज्ञानाने रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. २१ कोटींच्या खर्चाचे हे काम तीन टप्प्यात होणार आहे. (Concreting of roads with German technology in jalgaon news)

अनेक वर्षे खड्ड्यांमधून जीव मुठीत घेऊन वावरणाऱ्या जळगावकरांना गेल्या वर्षभरापासून नवीन रस्त्यांचे दर्शन होऊ लागल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या वर्षात लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका आहे.

महापालिका सभागृहाची मुदत गेल्या सप्टेंबरमध्येच संपल्याने आगामी वर्षात नंतरच्या टप्प्यात मनपाचीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून खड्ड्यात गेलेले शहर खड्ड्यांमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या सहकार्याने गेल्या काही काळात शहरातील रस्त्यांसाठी दोन टप्प्यात प्रथम १०० व नंतर ८५ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला.

८५ कोटींतून कामे सुरु

शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या जळगाव शहरातील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यात प्रमुख रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात काव्यरत्नावली चौक ते शिवतीर्थ चौक या जवळपास तीन किलोमीटर टप्प्यातील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामास दोन दिवसांपूर्वी काव्यरत्नावली चौकातून सुरवात झाली आहे.

असे होणार काम

८५ कोटींच्या निधीतून काव्यरत्नावली चौक ते टॉवर चौक या तीन साडेतीन कि.मी. रस्त्याचे काम २१ कोटी रुपये खर्च करून होणार आहे. धुळ्याच्या एस.बी. देशमुख एजन्सीला हे काम मिळाले असून या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १० मीटर रुंद असे काम होईल.

एकूण रस्ता बहुतांश ठिकाणी ३० मीटरचा असून रस्त्याच्या दुतर्फा साइड पट्टी व मध्ये दुभाजकाचा त्यात समावेश आहे. या रस्त्याचे काम विविध टप्प्यात होईल. त्यात काव्यरत्नावली चौक ते रॉयल पॅलेस, रॉयल पॅलेस ते आकाशवाणी चौक, आकाशवाणी चौक ते स्वातंत्र्य चौक व पुढे स्वातंत्र्य चौक- शिवतीर्थ, शिवतीर्थ ते टॉवर चौक अशा प्रकारे होईल.

वाहतूक नियमनासाठी

या प्रत्येक टप्प्यात सुरवातीला रस्त्याची एक बाजू बंद करून त्या बाजूचे काम होईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली राहील. पहिल्या बाजूचे काम पूर्ण झाले, रस्ता ‘ओके’ झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम हाती घेण्यात येईल. यामुळे वाहतुकीचे नियमन सुरळीत होऊन खोळंबाही होणार नाही.

काय आहे ‘सिक्स्डफॉर्म’ तंत्रज्ञान?

जळगाव शहरात प्रथमच एवढ्या प्रमुख व मोठ्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणाचे काम होतेय. त्यामुळे त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. जर्मन तंत्रज्ञानाच्या धर्तीवर ‘सिक्स्डफॉर्म’ यंत्रणेद्वारे कॉंक्रिटीकरण होत आहे. यात एका बाजूच्या दहा मीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण दोन भागात होऊ शकते.

स्टीलचे काम मॅन्युअली करून, कॉंक्रिट पसरविण्याचे व लेव्हलिंगचे काम या यंत्रणेद्वारे केले जाते. अन्य मशिनच्या तुलनेत याद्वारे काम सोपे व लवकर होते. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ही यंत्रणा आहे. याआधी अजिंठा चौक ते मानराज मोटर्सपर्यंत श्री.श्री.इन्फ्रास्ट्रक्चरने विकसित केलेल्या महामार्गाच्या कामासाठी अशा प्रकारची यंत्रणा वापरण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT