Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon : रस्त्यांची कामे होत नसल्याने महापालिकेत ‘दांगडो’!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पालकमंत्र्यांकडून मी माझ्या प्रभागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर करून घेतला आहे, मात्र आता तब्बल साडेसात कोटींचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. तुम्हाला दहा पत्रे दिली; परंतु तुम्ही अमृत नळजोडणीचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे रस्त्यांचे काम झालेच नाही.(confusion in meeting held in mayors hall Jalgaon municipal corporation regarding problem on highway Jalgaon latest News)

जर माझ्या भागातील रस्त्याचे काम झाले नाही, तर तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही, आणि महासभेतही आपण महापौर व उपमहापौर यांना सभा चालवू देणार नाही, असा इशारा नगरसेवक नितीन बरडे यांनी महापौरांच्या दालनात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे.

महामार्गावरील समस्येबाबत महापालिकेत महापौरांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, दिपमाला काळे, न्हाईचे अधिकारी चंद्रकांत सिन्हा, महापालिकेचे शहर अभियंनता एम. जी. गिरगावकर इतर अधिकारी उपस्थित.

शहरातील खड्डयांचे काय?

महामार्गावरील समस्यांची चर्चा झाल्यानंतर नगरसेवकांनी शहरातील रस्त्यावरील खड्डयांचा प्रश्‍न उपस्थित केला. महामार्गाचे झाले परंतु शहरातील रस्त्याच्या कामाबाबतही आम्हाला कळले पाहिजे. शहरातील रस्त्यांची कामे त्वरित झाली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली.

सात कोटींचा निधी शिल्लक

नगरसेवक नितीन बरडे यावेळी संतप्त झाले ते म्हणाले, प्रभागातील रामानंदनगर, गुरुकुल सोसायटी आदी भागातील रस्त्याच्या कामासाठी मी नियोजन मंडळातून तब्बल अकरा कोटी रूपये मंजूर करून आणले होते. मात्र त्यातील केवळ चार कोटीची कामे झाली, सात कोटीचा निधी अद्यापही शिल्लक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT