Employees in disconnection of property tax arrears. esakal
जळगाव

Jalgaon News : घरपट्टी कराची थकबाकी असलेल्या 58 जणांची नळजोडणी बंद; महापालिकेतर्फे धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : घरपट्टी कराची अनेक वर्षांपासून थकबाकी असलेले व अभय शास्ती माफी योजनेचा फायदा न घेणाऱ्या ५८ जणांची नळजोडणी महापालिकेमार्फत बंद करण्यात आली.

महापालिकेतर्फे ही धडक कारवाई करण्यात आली आहे.(Connection of 58 people with house tax arrears closed by municipal corporation jalgaon news)

महापालिकेतर्फे थकीत करधारकांना अभय शास्ती योजना लागू करण्यात आली आहे. एकूण ४८० थकीत मालमत्ताधारकांपैकी आतापर्यंत २०२ जणांनी संपूर्ण कराचा भरणा केलेला आहे. कर न भरणाऱ्या ५८ जणांची नळजोडणी कट करण्यात आली आहे.

तसेच थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ता करधारकांवर नळजोडणी कट करण्याची कारवाई ही शासकीय सुटीचे दिवस असल्यावरसुद्धा सुरू राहणार आहे.

अभय शास्ती योजनांचे शेवटचे चार दिवस बाकी आहेत. नागरिकांनी थकीत कर भरून या योजनेचा फायदा घ्यावा. रविवारी (ता. १७) शासकीय सुटीचा दिवस असूनदेखील प्रभाग समितीची सर्व कार्यालय पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत.

तरी या योजनेचा जास्तीत जास्त मालमत्ता करधारकांनी लाभ घ्यावा, असे महापालिका प्रशासनातर्फे जाहीर आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर विद्या गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे दाखल

Kolhapur Weather: कोल्हापुरात मध्यरात्री तापमान १४ अंश सेल्सिअसवर! दाट धुक्यात हरवले शहर, नागरिकांनी पेटवल्या शेकोट्या

SCROLL FOR NEXT