RBI Bank
RBI Bank  esakal
जळगाव

Jalgaon News : कर्जमाफीच्या संदेशापासून ग्राहकांनी सावध राहावे; ‘RBI’चे नागरिकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिराती, संदेशावर विश्वास ठेवू नका, यापासून सावध रहा, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

आरबीआयने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, कर्जमाफी संदर्भात काही संस्था समाजमाध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब चॅनल आणि बनावट वेबसाइट) यावर अनेक मोहिमांचे सक्रियपणे प्रचार करीत असल्याचे दिसून आले आहे. (Consumers should be wary of loan waiver messages RBI appeal to citizens jalgaon news)

अशा संस्थांना कोणत्याही अधिकाराशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी सेवा शुल्क आकारत असल्याच्या बातम्या आहेत. ज्यामुळे बँकांना आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता तारणावर त्यांचे अधिकार लागू करण्यासाठी बँकांच्या कामकाजात अडथळा येतो.

बँकांसह इतर वित्तीय संस्थांची थकबाकी भरण्याची गरज नाही, असा चुकीचा अर्थ अशा संस्था देत आहेत. अशा कृतीमुळे वित्तीय संस्थांची स्थिरता आणि सर्वात महत्त्वाचे ठेवीदारांच्या हितास बाधा येत आहे.

यामुळे हे देखील लक्षात घेतले जाऊ शकते. अशा संस्थांशी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी संबंध ठेवल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

पोलसांना कळवा

खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या समाजमाध्यमातील बँकाविषयाची खोट्या प्रचार मोहिमांना बळी पडू नये. खोट्या घटना आढळल्यास आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती द्यावी किंवा तक्रार नोंदवावी, असे परिपत्रक आरबीआयमार्फत जारी करण्यात आले आहेत.

समाजमाध्यमावरील खोट्या प्रचार मोहिमा करणाऱ्या संस्थेच्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणव झा यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT