Sushma Andhare esakal
जळगाव

Sushma Andhare : उद्धव ठाकरेंविरोधात कपटकारस्थान झाले, गुलाबराव तुम्हाला पाझर का फुटला नाही?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मी एकेकाळी शिवसेनेच्या विरोधात टीकाकार होते; मात्र ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कपटकारस्थान करण्यात आले त्या वेळी आमच्यासारख्या टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटला आणि आम्ही पडत्या काळात त्यांच्या पाठीशी साथ देण्यासाठी उभे राहिलो. मात्र तुम्ही तीस वर्षे त्यांच्या सोबत होता. मात्र त्यांना सोडून तुम्ही निघून गेलात. गुलाबराव, तुमच्या काळजाला पाझर का नाही फुटला? अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केली. जळगावात पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी महाप्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मंगळवारी (ता. १) जळगाव जिल्ह्यात दाखल झाली, त्या वेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, अंकुश कोळी यांनी श्रीमती अंधारे व शरद कोळी यांचे स्वागत केले. (Controversial Statement of Sushma Andhare on Water Supply Minister Gulabrao Patil Jalgaon political News)

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रीमती अंधारे म्हणाल्या, जिल्ह्यात पाच आमदार शिवसेनेतून गेले. मात्र आम्हाला त्याचा काही फरक पडला नाही. आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात शिवसैनिकांमुळे आमदार असतात. जिल्ह्यातील पाच आमदार व काही गिने चुने टेंडर आणि गुत्तेगिरीतीच्या राजकारणातले त्यांच्या सोबत गेले असतील. मात्र यामुळे जळगावात शिवसेना क्षीण झाली, असे आम्हाला वाटत नाही. जिल्ह्यातील शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभा आहे तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आदित्य ठाकरे यांची जळगावातील सभा ‘भूतो न भविष्यती’ अशी झाली. सत्ता असताना फुटीर आमदारांना वाय प्लस सुरक्षा घेऊन त्यांना इथे फिरावे लागतं, यातच उत्तर आले.

गुलाबराव सत्तेत मस्तवाल झाले

राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीमती अंधारे यांना शिवसेनेच्या विरोधी टीकाकार म्हटले होते. त्यावर श्रीमती अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, एकेकाळी मी टीकाकार होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही शिवसेनेवर टीका केली, मात्र शिवसेनेच्या पडझडीच्या काळात एकानेही साथ सोडून जाण्याची भाषा केली नाही. मी टीकाकार असूनही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जे कपटकारस्थान झाले, त्यामुळे माझ्या काळजाला पाझर फुटला आणि पडत्या काळात साथ देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. टीकाकारांच्या काळजाला पाझर फुटतो. मात्र गुलाबराव पाटील तुमच्यासारखी सत्तेचा मलिदा खाणारे लोक तीस तीस वर्ष शिवसेनेच्या जिवावर गलेलठ्ठ आणि मस्तवाल झाले. गुलाबभाऊ, तुमच्या काळजाला पाझर का फुटत नाही? गुलाबराव पाटील तुमच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कोणती करणी, भानामती, काळी जादू केली आहे, ज्यामुळे तुम्ही निगरघट्ट व पाषाण हृदयी झालात. बहीण म्हणून गुलाबराव, तुमच्या विवेकाला हात घालते. बघा, तुमचा विवेक जागला तर चांगलेच आहे, अशी आर्त हाकही श्रीमती अंधारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT