Corona Test sakal
जळगाव

Jalgaon : कोरोना रुग्णवाढीचा धोका तरी चाचण्या मर्यादितच

रुग्णवाढीचा धोका असतानाही जळगाव शहरात चाचण्यांची संख्या मर्यादितच आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमध्ये कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत असताना जळगाव शहरासह जिल्ह्यातही संसर्गाचा धोका वाढला आहे. मात्र, महापालिका प्रशासन अद्याप त्याबाबत सतर्क नाही. रुग्णवाढीचा धोका असतानाही जळगाव शहरात चाचण्यांची संख्या मर्यादितच आहे.

दरम्यान, यासंदर्भात आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन दिले असून वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

जळगाव ठरले होते ‘हॉटस्पॉट’

मार्च २०२०मध्ये राज्यात व जळगाव जिल्ह्यातही कोरोना महामारीने ‘एन्ट्री’ केली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वाधिक जीवितहानी महाराष्ट्रात झाली. पहिल्या दोन्ही लाटांमध्ये जळगाव शहर हॉटस्पॉट ठरले होते. तिसरी लाट त्या तुलनेत अगदीच सौम्य होती.

...तरीही उदासीनता कायम

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर आदी शहरांत रुग्णवाढ मोठी असून या सर्व शहरांचा प्रवाशांच्या माध्यमातून जळगावशी मोठा कनेक्ट आहे. त्यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात रुग्णवाढीचा धोका निर्माण झाला आहे. असे असताना महापालिकेकडून अद्याप चाचण्या वाढविण्यात आलेल्या नाहीत.

पंधरा-वीसच चाचण्या

सध्या जळगाव शहरात महापालिकेचे एकमेव चाचणी केंद्र शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरु आहे. त्याठिकाणी दिवसभरात केवळ १५-२० चाचण्या होत आहेत. सध्या शहरात दोनच सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण वाढू लागल्यानंतर चाचण्यांची केंद्र वाढविण्यात येतील, असे सांगितले जात आहे.

आमदारांच्या सूचना

आमदार सुरेश भोळेंनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात याव्या. प्रत्येक प्रभागात सर्वेक्षण करून १०० टक्के लसीकरण करण्यावर भर द्यावा, यासह अन्य सूचना भोळेंनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT