corona Free patient sakal
जळगाव

जळगाव : नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक

४२८ नवे रुग्ण, ५२६ कोरोनामुक्त; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग कायम आहे. शनिवारी (ता. २२) सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात चारशेवर नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ५२६ कोरोनामुक्त झाले. त्यामुळे दिलासा मिळाला, तर तिसऱ्या लाटेत शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी एका मृत्यूची नोंद झाल्याने चिंताही वाढली.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णाची संख्या आता तीन हजार १२७ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता गेल्या आठवड्यापासून वाढली. रोजचे रुग्ण चारशेच्या वर समोर येऊ लागले. आज प्राप्त चाचण्यांच्या अहवालापैकी ४२८ रुग्ण बाधित आढळून आले. तर दिवसभरात तब्बल ५२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या तीन हजार १२७ झाली असून, त्यापैकी केवळ ६० रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. उर्वरित तीन हजार ६७ रुग्ण लक्षणविरहित अथवा अगदी सौम्य लक्षणे असलेली आहेत.

आणखी एकाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाली. २२ दिवसांत आज पुन्हा एकाचा बळी गेला. जळगाव शहरातील ४२ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात दाखल होण्याआधी मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

जळगाव, भुसावळला दिलासा

जळगाव शहरात शनिवारी १३१ नवे रुग्ण वाढले, तर १६८ बरे झाले, तर भुसावळला आज ५० नवे बाधित आढळले आणि तब्बल २०७ रुग्ण बरे झाले.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर १३१, भुसावळ ५०, जळगाव ग्रामीण- आठ, अमळनेर- ४१, चोपडा- ८०, पाचोरा- एक, भडगाव- १३, धरणगाव- तीन, यावल- १२, रावेर- दोन, पारोळा- तीन, चाळीसगाव- ५१, बोदवड- ३१. एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT