Corona Updates Sakal
जळगाव

जळगाव : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढता

दिवसभरात ४६ नवे बाधित सक्रिय रुग्णसंख्या १३६

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून असलेला कोरोना रुग्णसंख्येचा(corona patient) आलेख गुरुवारीही वाढताच होता. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात नव्या ४६ रुग्णांची नोंद झाली. या वाढत्या संख्येने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने तीन महिन्यांनंतर प्रथमच शंभरी पार करत १३६चा आकडा गाठला.

जळगाव जिल्ह्यात जुलै २०२१नंतर रुग्णसंख्या झपाट्याने घटली. ऑक्टोबरनंतर सक्रिय रुग्णांची संख्या शंभराच्या खाली गेली. मात्र, आता जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून तिसऱ्या लाटेला सुरवात होऊन रुग्णसंख्येचा आलेख वाढायला लागला आहे.(Jalgaon news)

तब्बल ४६ रुग्ण

गुरुवारी दिवसभरात जळगाव जिल्ह्यात तब्बल ४६ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात जळगाव शहरातील १५, भुसावळ २१, अमळनेर २, धरणगाव व रावेर प्रत्येकी १, चाळीसगाव ३ असे रुग्ण आढळून आलेत. आज आरटीपीसीआरच्या ४९२ अहवालांपैकी ३० तर एन्टीजेनच्या १२४८ चाचण्यांच्या अहवालातून १६ रुग्ण बाधित आढळले. एकूण १७४० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या १३६ झाली असून त्यातील १२२ रुग्ण लक्षणे नसलेले व केवळ १४ रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. सद्य:स्थितीत केवळ एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे. तर आयसीयूत एकही रुग्ण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

Pune fuel saving news : इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मेट्रो, बस व कार पूलिंगचा अधिक वापर करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT