nursery school nursery school
जळगाव

नर्सरीच्या ४० टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ !

सातत्याने होत असलेल्या लॉकडाउनमुळे सर्वाधिक चिंता वाढली ती शिक्षण क्षेत्राची

सचिन जोशी

जळगाव : एरवी फेब्रुवारीपासून हजारोंची कॅश सोबत घेऊन पाल्यांच्या नर्सरीतील प्रवेशासाठी शाळांच्या (Nursery Admission) प्रवेशद्वारासमोर रात्रीचा दिवस करणाऱ्या पालकांनी (parents) यंदा आपल्या चिमुकल्यांच्या प्रवेशाकडेच पाठ फिरवली आहे. जवळपास ४० टक्के नर्सरी प्रवेश (Corona infection) यंदा झालेच नाहीत, तर चौथीतून पाचवीतील प्रवेशांनाही ‘ब्रेक’ लागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. संसर्ग वाढू नये, म्हणून सातत्याने होत असलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) सर्वाधिक चिंता वाढली ती शिक्षण क्षेत्राची. विद्यार्थ्यांच्या भविष्याचाच प्रश्‍न यामुळे निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शाळा ओस पडल्यात, शाळा (School) व्यवस्थापनासह पालक व विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
(corona lockdown effect nursery school admissions forty percent drop)

दीड वर्षापासून शाळा ‘लॉक’
कोरोनामुळे मार्च २०२० पासून देशव्यापी लॉकडाउन सुरू झाले. दरम्यानच्या काळात ते शिथिल झाले. मात्र, शाळा-महाविद्यालये सुरू होऊ शकली नाहीत. आता पुन्हा दोन महिन्यांपासून संसर्ग वाढल्याने लॉकडाउन सुरू आहे. अगदी शैक्षणिक वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची दुर्दैवी वेळ सरकारवर आलीय. वर्षभरापासून बंद शाळा, महाविद्यालये आता येणाऱ्या काळातही कधी सुरू होतील, याबाबत अनिश्‍चितता आहे.

नर्सरीचे प्रवेश थांबले
एरवी चिमुकल्यांच्या नर्सरी प्रवेशाचे प्लॅनिंग पालक बाळ झाल्याबरोबरच करतात. साधारण दर वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत प्रवेशप्रक्रिया सुरू होते. गेल्या वर्षी पालकांनी शाळांचे उंबरठे झिजवत हजारोंचे डोनेशन देत पाल्यांचे प्रवेश निश्‍चित केले आणि वर्षभरात शाळेचे तोंडही पाहिले नाही, अशी स्थिती होती. आता सलग दुसऱ्या वर्षी तीच स्थिती असल्याने नर्सरीची प्रवेशप्रक्रियाच ठप्प झाली आहे.

४० टक्के विद्यार्थ्यांची पाठ
वर्षभरात कसेबसे ऑनलाइन वर्ग झाले, हा विशेषत: शहरी पालकांचा अनुभव. त्यामुळे नर्सरी, ज्युनिअर केजीत प्रवेशासाठी सज्ज विद्यार्थ्यांच्या पालकांनी यंदा ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली. जळगाव शहर व जिल्ह्यातील प्रमुख इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यंदा ५० ते ६० टक्केच नर्सरी प्रवेश होऊ शकल्याचे विदारक चित्र आहे.

पाचवीचे प्रवेशही थांबले
पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा तर एक दिवसही झाल्या नाहीत. माध्यमिकची तीच स्थिती आहे. नववी, दहावीचे वर्ग एक- दोन महिने, तेही मोजक्या शाळांमध्ये झाले. आगामी शैक्षणिक वर्षातही ऑनलाइनच वर्ग होणार असल्याने पालकांचा त्यावर विश्‍वास नाही. माध्यमिक शाखेत पाचवी ते आठवीचे वर्ग होण्याबाबत शंका आहे. त्यामुळे चौथीतून पाचवीतील प्रवेशांनाही ‘ब्रेक’ लागला आहे. जवळपास दहा टक्के विद्यार्थ्यांनी पाचवीत प्रवेश पक्का केला नाही, अशी माहिती समोर आली आहे.


पूर्व प्राथमिक शाळांमधील प्रवेश सर्वांत जास्त प्रभावित झाले. नर्सरी, ज्युनिअर केजी या वर्गात प्रवेश न घेता आता थेट पहिलीत प्रवेश घेऊ, अशा भूमिकेत पालक आहेत. यामुळे शाळांच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- चंद्रकांत भंडारी, शालेय समन्वयक, जळगाव

(corona lockdown effect nursery school admissions forty percent drop)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT