जळगाव

हॉटस्पॉट ठरलेले जळगाव शहर नियंत्रणात.. केवळ सोळा नवे बाधित

गेल्या महिन्याभरापासून रुग्ण संख्या झपाट्याने खाली येत आहे

भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग (Corona infection) कमी होत असून दोन महिन्यांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या (Number of patients) आठ हजारांच्या जवळपास आली आहे. शनिवारी जिल्ह्यात ४०५ नवे रुग्ण आढळून आले, तर ८७५ बरे झाले. दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू (death) झाला.

(jalgaon city corona infection control)

जळगाव जिल्ह्यात या महिन्याच्या सुरवातीपासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार २४ तासांत साडे आठ हजारांवर चाचन्याचे अहवाल प्राप्त झाले त्यात ४०५ नवे रुग्ण समोर आले. एकूण रुग्णसंख्या एक लाख ३७ हजार ९५१ झाली आहे. तर ८७५ रुग्ण दिवसभरात बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडाही एक लाख २७ हजार १६७ वर पोचला आहे. रिकव्हरी रेट आता ९२. १८ टक्क्यांपर्यंत आहे. २४ तासांत नऊ रुग्णांचा मृत्यू झाला, एकूण बळींचा आकडा दोन हजार ४७८ झाला आहे.

हॉटस्पॉट जळगाव शहर नियंत्रणात

जळगाव शहरात गेल्या तीन-चार महिन्यापासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या होती. परंतू गेल्या महिन्याभरापासून रुग्ण संख्या झपाट्याने खाली येत आहे. गेल्या दोन तिन महिन्यात रुग्णांची आकडेवारी २५० ते ३०० च्या घरात येत होती. परंतू आता वीसच्या घरात ही आकडेवारी आली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील कोरोना नियंत्रणा आला आहे. परंतू जामनेर, चोपडा, चाळीसगाव येथील रुणसंख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- १६, जळगाव ग्रामीण- ८, भुसावळ- ३३, अमळनेर- २३, चोपडा- ३६, पाचोरा- २८, भडगाव- २, धरणगाव- १४, यावल- २२, एरंडोल- २५, जामनेर- ४८, रावेर- ३१, पारोळा- १७, चाळीसगाव- ५५, मुक्ताईनगर- ८, बोदवड- २३. इतर जिल्हा- १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT