जळगाव

चिंताजनक बातमीः जळगाव जिल्ह्यात चाचण्यां बरोबरच कोरोनाचे नविन रुग्ण वाढले

सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून वाढत जाणारा कोरोनाचा उद्रेक कायम आहे. आज सलग सहाव्या दिवशी नव्या रुग्णांनी तीनआकडी संख्या गाठत गेल्या पाच महिन्यांतील उच्चांकी म्हणजे ३६८चा आकडा गाठला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ६० हजारांच्या टप्प्यात आहे. 


जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांपासून नियंत्रणात येत असलेला कोरोनाचा संसर्ग तीन आठवड्यांपासून पुन्हा वाढत आहे. गेल्या सहा- सात दिवसांत तर तो नियंत्रणाबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी नव्याने ३१९ रुग्ण सापड्ल्यानंतर मंगळवारीही तब्बल ३६८ नवे रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण आकडा ५९ हजार २२२वर पोचला आहे. तर गेल्या २४ तासांत १०१ रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्याही ५६ हजार २७९ झाली आहे. दोघांचा मृत्यू झाल्यानंतर बळींचा आकडा १३७७ झाला असून प्रचंड वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे मृत्यूदर स्वाभाविकच कमी होऊन २.३३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. 


दोन हजारांवर चाचण्या 
तीन आठवड्यांपासून वाढत जाणारी रुग्णसंख्या बघता जिल्हाधिकाऱ्यांनी चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आरोग्य यंत्रणेने या आठवड्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्यानुसार मंगळवारी ११७० आरटीपीसीआर व १२२३ अॅन्टीजेन म्हणजे एकूण २४०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त होऊन त्यापैकी ३६८ अहवाल पॉझिटिव्ह आले. 
 

जळगाव शहर रेड झोन 
जळगाव शहरातील संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांनी शंभरी पार केली. सोमवारी १५८ रुग्ण आढळून आल्यानंतर मंगळवारी तब्बल १६२ रुग्ण समोर आले. त्याखालोखाल चाळीसगाव ५५, जळगाव ग्रामीण ३४, चोपडा २८, भुसावळ २३, मुक्ताईनगर २३, एरंडोल ६, रावेर ७, अमळनेर ५, पाचोरा, भडगाव, धरणगाव तालुक्यात प्रत्येकी २, पारोळा ७, बोदवड ३ असे रुग्ण आढळून आले. 

गंभीर रुग्ण दीडशेपर्यंत 
वाढत्या रुग्णसंख्येसोबत ॲक्टिव व गंभीर रुग्णांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात मंगळवारी १५६६ सक्रिय रुग्ण होते. त्यापैकी ९४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५२ गंभीर रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. 


 
संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT