corona corona
जळगाव

कोरोना संसर्गाची तीव्रता कमी..पण मृत्यूच्या आकड्यांनी चिंता वाढवली

दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांचा आकडा तब्बल निम्म्याने कमी

सकाळ वृत्तसेवा




जळगाव : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होऊन (second wave Decreased) रुग्णसंख्या (patient control) नियंत्रणात येत असली तरी तरुणांचे मृत्यू (death numbers) चिंताजनक (Worrying) बनत आहेत. बुधवारी विशीतल्या दोघा तरुणांसह १२ जणांचा दिवसभरात बळी गेला. नवी रुग्णसंख्या साडेतीन महिन्यानंतर प्रथमच पाचशेच्या आत नोंदली गेली.

(jalgaon dictrict new corona patient control but death numbers worrying)


जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होत आहे. महिनाभरात दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांचा आकडा तब्बल निम्म्याने कमी झाला आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत ४९४ नवे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या १ लाख ३६ हजार ७७९ झाली. तर ५१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २४ हजार ८५८ झाला असून हे प्रमाण ९१.२८ टक्क्यांवर पोचले आहे.

चाचण्या वाढल्या
जिल्ह्यात रुग्णांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. गेल्या आठवड्यात पाच हजारांच्या आत चाचण्या घटल्या होत्या. तर आता दोन दिवसांपासून ते प्रमाण वाढविले आहे. बुधवारी ७ हजार ६६७ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत.

तरुणांचा बळी चिंताजनक
एकीकडे रुग्णसंख्या नियंत्रणात येत असली तरी मृत्यूची चिंता कायम आहे. बुधवारी जळगाव शहरात तिघा महिलांसह एका परुषाचा मृत्यू झाला. तर भुसावळ तालुक्यातील १९ व रावेर तालुक्यातील २५ वर्षीय तरुणासह एकूण १२ जणांचा दिवसभरात बळी गेला. एकूण बळींचा आकडा २४५० वर पोचला आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहरात बुधवारी ४४ नवे रुग्ण आढळून आले तर त्यापेक्षा जवळपास तीनपट म्हणजे ११५ रुग्ण बरे झाले. अन्य ठिकाणचे रुग्ण असे : जळगाव ग्रामीण १७, भुसावळ ७८, अमळनेर १८, चोपडा ४९, पाचोरा ९, भडगाव १, धरणगाव २५, यावल ३३, एरंडोल २२, जामनेर ३४, रावेर ३१, पारोळा ७, चाळीसगाव ४७, मुक्ताईनगर ४०, बोदवड ३७.

(jalgaon dictrict new corona patient control but death numbers worrying)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT