जळगाव

जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची मागणी निम्म्यावर

सचिन जोशी



जळगाव : महिनाभरापूर्वी बेडही मिळत नसल्याची स्थिती असताना आता कोरोनाचा (corona) संसर्ग नियंत्रणात (Infection control) येत आहे. सक्रिय रुग्णांसह गंभीर रुग्णांची संख्याही कमी होत असून, त्यामुळे ऑक्सिजन (Oxygen) व रेमडेसिव्हिरची (Remdesivir) मागणीही निम्म्यावर आली आहे.

(jalgaon district corona Infection control patient numbers low)


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात पहिल्या लाटेसारखीच भीषण स्थिती निर्माण झाली होती. फेब्रुवारीअखेरपासून सुरू झालेल्या या दुसऱ्या टप्प्यात एप्रिलमध्ये मात्र जिल्ह्यातील रुग्णसंख्या शिखरावर पोचली होती. एप्रिलअखेर रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होऊ लागली. मेमध्ये तर नव्या बाधितांची संख्या कमी व बरे होणारे अधिक, अशी स्थिती निर्माण झाली.


सक्रिय, गंभीर रुग्ण घटले
संसर्गाची तीव्रता कमी होऊ लागल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही घटू लागली आहे. ११ हजारांवर पोचलेल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी होऊन शुक्रवारी नऊ हजारांच्या टप्प्यात आली. त्यासोबत ऑक्सिजन व आयसीयूतील रुग्णसंख्याही बऱ्यापैकी कमी झाली.


ऑक्सिजनही निम्म्यावर
दुसऱ्या लाटेत देशभरात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली होती. जळगाव जिल्ह्यातही गेल्या महिन्यात रुग्णसंख्या ‘पीक’वर असताना दिवसाला ४० टन ऑक्सिजन लागत होता. आता महिनाभरापासून ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या घटल्याने ऑक्सिजनची मागणीही निम्म्यावर आली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ८७९ रुग्ण ऑक्सिजनवर असून, ४८५ आयसीयूत आहे. त्यांच्यासाठी दिवसाला जवळपास २० टन ऑक्सिजनची गरज भासत आहे.


रेमडेसिव्हिरच्या मागणीत घट
गेल्या महिन्यापर्यंत काळ्या बाजारात २०-२५ हजारांना मिळणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन आता शासनाने ठरवून दिलेल्या किमतीत सहज उपलब्ध होत आहे. या इंजेक्शनचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे असून, आता मागणीत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे. महिनाभरापूर्वी दिवसाला बारा-पंधराशे इंजेक्शन लागत होती, ती मागणी घटून आता पाचशेच्या आत आली आहे.

जिल्ह्यातील स्थिती अशी
एकूण सक्रिय रुग्ण : ८७८८
लक्षणे असलेले : १६२५
ऑक्सिजनवरील : ८७९
आयसीयूतील : ४८५



जिल्ह्यात तीन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग तीव्र होऊन, रुग्णसंख्या प्रचंड वाढूनही ऑक्सिजन अथवा रेमडेसिव्हिरची कमी पडू दिली नाही. योग्य नियोजन केल्यामुळे ऑक्सिजनची मागणी व पुरवठा यात कोणतीही तफावत झाली नाही. आतातर मागणीच निम्म्याने घटली आहे.
- डॉ. अनिल माणिकराव
निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT