covid covid
जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग येतोय नियंत्रणात !

शनिवारी साडेसात हजार चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले.

भूषण श्रीखंडे

जळगाव : कोरोनाची (corona) दुसरी लाट आता जळगाव जिल्ह्यात नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांतील सर्वांत कमी मृत्यूची नोंद शुक्रवारी आणि आज (ता. २९) झाली. दिवसभरात अवघ्या चार रुग्णांचा मृत्यू (corona death) झाला. शिवाय, नव्या बाधितांची संख्याही दीडशेच्या टप्प्यात म्हणजे १६६ नोंदली गेल्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

(jalgaon district corona infection is under control )

जिल्ह्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सुरवातीला कोरोनाचा कहर सुरू झाला होता. मे महिन्याच्या सुरवातीपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. प्रशासनाकडून लावण्यात आलेले लॉकडाउनचा (Lockdown) देखील मोठा प्रभाव पडल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झालेला दिसत आहे. नव्याने बाधितांची संख्या कमी होत असून, त्यामुळे सक्रिय रुग्णही घटले आहेत. शनिवारी साडेसात हजार चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी केवळ १६६ नवे रुग्ण समोर आले. एकूण रुग्णसंख्या एक लाख ३९ हजार ६६६ झाली आहे, तर ३९७ रुग्ण बरे झाले. यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३० हजार ९५१ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत चार जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा दोन हजार ५२४ झाला आहे.

आठ तालुक्यांत दहाच्या आत

संसर्ग कमी होत असल्याची चिन्हे ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. जिल्ह्यातील १५ पैकी नऊ तालुक्यांमध्ये शुक्रवारी आठपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. पैकी भडगाव, धरणगाव व अमळनेर या तीन तालुक्यांत एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहरात १४ रुग्ण आढळून आले, तर ३८ बरे झाले. जळगाव ग्रामीण तीन, भुसावळ १६, चोपडा तीन, पाचोरा सात, यावल १०, एरंडोल ६४, जामनेर १४, रावेर तीन, पारोळा आठ, चाळीसगाव १९, मुक्ताईनगर दोन, बोदवड दोन, इतर जिल्ह्यातील एक रुग्ण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT