जळगाव

जळगाव जिल्ह्यात लवकरच 'कोरोना’ची लस; प्रथम या कर्मचाऱ्यांना दिली जाणार लस !

देविदास वाणी

जळगाव ः कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिम देशात लवकरच सुरू होणार आहे. या अभियानानुसार जळगाव जिल्ह्याला पंधरा दिवसात लस येणार  आहे माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली. त्यासाठी केंद्र शासनाकडून कोरोना लसीकरणाचे किट लवकरच जिल्ह्यात येणार आहे.
 

आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूका आल्या रंगात; भावी सरपंचांचा आखाडा तापला !    


जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनावर येणाऱ्या लशीचे संशोधन पुणे झाले आहे. या लसीकरणाची चाचणी म्हणून उद्या (ता.२) नंदुरबारला लस दिली जाईल. आगामी पंधरा दिवसात जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. 

३२ हजार डोस येणार 

लसीकरण झाल्यानंतर महिनाभरात संबंधित व्यक्तीवर काय परिणाम होतात. विपरीत परिणाम झाले नाही तर लागलीच दुसरा डोस दिला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात प्रथम ३२ हजार डोस येणार आहे. 

कोरोना लसीकरण क्रमानूसार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच देशात लस उपलब्ध होण्याचे संकेत दिले आहेत. कोरोना लसीकरणाचा क्रम अगोदरपासूनच ठरलेला आहे. लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर एका महिन्यानंतर लागलीच दुसरा डोस दिला जाणार आहे. 

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रथम लस

लसीकरण मोहिमेच्या क्रमात सर्वांत अगोदर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालयांतील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफ, अधिकारी यांची माहिती केंद्र सरकारला जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे माहिती संकलित करण्यात येत आहे. सुमारे १६ हजार डॉक्टर, नर्स, इतर स्टाफ, लॅब टेक्निशियन, असिस्टंट आदींची माहिती संकलित करण्यात आली आहे. ती राज्य शासन व केंद्र सरकारकडे पाठविली आहे.

 

आगामी पंधरा कोरोना लस येईल, असे संकेत आहेत. सर्व खासगी व शासकीय आरोग्याधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, इतर स्टाफला ही लस अगोदर दिली जाणार आहे. १६ हजार जणांचे प्रथम लसीकरण करण्यात येईल. 
-डॉ. एन. एस. चव्हाण, 
जिल्हा शल्यचिकित्सक 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT