जळगाव

चिंता वाढवणारी बातमी; जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय !  

भूषण श्रीखंडे

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र काही दिवसांपासून समोर येत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून पॉझिटिव्हिटी रेट ६ टक्क्यांपेक्षा अधिक झाला असून, आज जळगाव जिल्ह्यात नवीन बाधिंताचा आकडा हा पन्नासी पार गेला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याने पून्हा चिंता निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा जळगाव शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. यात रविवारीही जिल्ह्यात आढळलेल्या ४१ रुग्णांमध्ये तब्बल २७ रुग्ण एकट्या जळगाव शहरातील होते. विशेष म्हणजे चाचण्या कमी होऊनही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसतोय.

आज ५७ रुग्ण आढळले

आज जिल्ह्या नविन ५७ बाधित आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५६ हजार ३७५ वर पोचली आहे. तर दिसभरात ४९ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ५३९ झाला आहे. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, चोपडा शहरातील साठ वर्षाचा वृध्दाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्याही एक हजार ३३९ झाली आहे. 

असे आढळले आज रुग्ण 
सोमवारी जळगाव शहरात २०, भुसावळ ५, अमळनेर ७, चोपडा ९, भडगाव ३, रावेर २, पारोळा २, चाळीसगाव४ तर जळगाव ग्रामीण,  पाचोरा येथे प्रत्येकी एक असे रुग्ण आढळले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT