corona update  esakal
जळगाव

Jalgaon News : कोरोनाचा रुग्ण नाही, तरीही जिल्ह्यात सतर्कता

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सध्या चीनमधील कोरोनाच्या उद्रेकामुळे जगाची चिंता वाढली असून, केंद्र व राज्य सरकार सतर्क झाले आहे. जळगावात सध्यातरी कोरोना रुग्ण नाही. मात्र, काळजी म्हणून प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात रोज साधारणपणे दोनशेवर कोरोना चाचण्या होत आहेत. पैकी कुणीही पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जळगाव शहरात दोन महिन्यांत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. (Corona patient still vigilance in district Over 200 tests per day Insist on use of masks Jalgaon News)

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा उद्रेक झाला आहे. दररोज लाखो लोक संसर्गित होत असून, हजारोंच्या संख्येने मृत्यूही होत आहेत. जपान, अमेरिका, फ्रान्समध्येही रुगणसंख्या वाढू लागली आहे. या पाश्‍र्वभूमीवर भारतातही सतर्कतेचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

जळगावात यंत्रणा अलर्ट

देशात व राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पाश्‍र्वभूमीवर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठकही गुरुवारी (ता. २२) झाली. जळगाव जिल्ह्यात रुग्ण नसले, तरी यंत्रणा मात्र अलर्ट झाली आहे. सध्या शहरात व जिल्ह्यात मिळून रोज दोनशेवर चाचण्या केल्या जात आहेत. या तपासण्यांची संख्या आता वाढविण्यात येईल. जळगाव महापालिकेकडून न्यायालयात सादर होणाऱ्या संशयित, आरोपी, कैद्यांची कोरोना चाचणी केली जाते. महापालिकेत येणाऱ्यांची रॅन्डम पद्धतीने चाचणी होत आहे. महापालिकेचे चाचणी केंद्र अद्याप त्याच शासकीय तंत्रनिकेतनच्या ठिकाणी सुरू आहे.

जिनोम सिक्वेंसिंग होणार

चीनमधील उद्रेकाच्या पार्श्वर्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चाचणीतून पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या नमुन्यांचे ‘जिनोम सिक्वेंसिंग’ होणार आहे. त्याद्वारे बाधित रुग्णामधील व्हायरस नेमका कोणत्या व्हेरिएंटचा आहे, ते कळू शकणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Chh. Sambhaji Nagar News : फुलंब्री निवडणुकीत जादूटोण्यामुळेच निवडणुकीत पराभव; शिवसेना उमेदवाराचा गंभीर आरोप!

Alandi Election : आळंदी नगरपरिषदेतील गटनेता, उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्य निवडीसाठी चर्चासत्र सुरु!

SCROLL FOR NEXT