Corona News esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भारतानेही दखल घेतली आहे. राज्यात सत्कर्तचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (ता. २५) कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. (Corona situation in jalgaon district Guardian Minister gulabrao patil took a review jalgaon news)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा, सिलिंडर यांची तपासणी करून तयार ठेवावेत. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोरोना कक्ष सुरू करावा यांसह कोरोना रुग्णांवर उपचारासाठी औषधे, स्टाफ, सनिटाॅयझर, ऑक्सिजन सिलिंडर आदींची व्यवस्था करून ठेवा, जिल्ह्यात रुग्ण वाढले, तर त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी यंत्रणेने सज्ज असले पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

मंत्री महाजन यांनीही कोरोनाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. शहरासह जिल्ह्यातील लसीकरण केंद्र नव्याने सुरू करून ज्यांचा बुस्टर डोस बाकी आहे, त्यांना डोस देण्याबाबत सूचना या वेळी करण्यात आल्या.

विशेषतः जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू केले होते. त्याची नियमित निगा राखून त्यातून ऑक्सिजन निर्माण होईल, यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT