जळगाव

तिसऱ्या लाटेची तयारी..मोहाडी रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांट

आरोग्य विषयी साहित्य सामाजिक दायित्वातून अनेक जणांनी आतापर्यंत दिल्या आहेत.

देविदास वाणी



जळगाव : मोहाडी येथील महिला रुग्णालय ( Mohadi Women's Hospital) आगामी काळात सामाजिक दातृत्वातून अतिउत्कृष्ठ सेवा असणारे रुग्णालय होणार आहे. सध्या तेथे एकच ऑक्सिजन प्लांट (Oxygen plant) तयार होणार होता. मात्र, आगामी तिसरी लाट (Corona third wave) पाहता तेथे दोन ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण (District Surgeon Dr. N. S. Chavan)यांनी दिली. (corona third wave preparation womens hospital oxygen plant)

त्यातील एक प्लांट २० किलोलिटर क्षमतेचा लिक्वीड प्लांट असेल तर दुसरा ऑक्सिजन प्लांट ऑक्सिजन जनरेटर प्लांट असेल. जो एक हजार पर मिनीट ऑक्सीजन तयार करेल. या दोन्ही प्लांटसाठी आज जागेची निश्‍चीत करून पाया तयार करण्याच्या आर्डरही देण्यात आल्या आहेत.

सीटी स्कॅन अन्‌ सोनोग्राफीही मशिन

मोहाडी रुग्णालयात लागणाऱ्या आरोग्य विषयी साहित्य सामाजिक दायित्वातून अनेक जणांनी आतापर्यंत दिल्या आहेत.काही महिन्यात तेथे रुग्णांसाठी सीटी स्कॅन मशिन, सोनोग्राफी मशिनही बसविली जाणार आहे. ऑक्सिजन पाईप लाईन थ्री वेची असेल.

५० बेड बालरुग्णांसाठी

मोहाडी रुग्णालय जेम्बो रुग्णालय असणार आहे.आगामी काळात बालकांना कोरोना होण्याचा धोका अधिक असल्याने त्याठिकाणी ५० बेड बाल रुग्णांसाठी आरक्षित असतील. आय.सी.यू.चे शंभर बेड असतील तर ६५० बेड ऑक्सीजनचे असतील.

खासगी डॉक्टरांची मदत घेणार

जिल्हा कोविड रुग्णालय व मोहाडी रुग्णालयात कोरोना बाधीत बालकांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर असतीलच सोबत खासगी व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. बालरोग तज्ञ नसल्याचा बाऊ केला जाणार नाही. खासगी व ग्रामीण रुगणालयातील डॉक्टर नियमित तपासणी करून औषधोपचार लिहून देतील. तो रुग्णांना देण्याचे काम नर्सिंग स्टाफ करेल. ग्रामीण रुग्णालयातील रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा येथे बालरोग तज्ञ आहे. त्यांना काही उपचारासाठी बोलावू, काही दिवस खासगी डॉक्टरांना सेवा देण्यास सांगू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant यांचा प्लॅन उघड! सुप्रीम कोर्टात काहीतरी मोठं घडणार..नियम एकदम बदलले, नेमकं चाललंय काय?

Mangalwedha Nagarparishad Election : अखेर मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक नव्याने जाहीर; मतदान २० तर मतमोजणी २१ डिसेंबरला

Kalamb News : पतसंस्थेच्या स्वच्छतागृहात महिलेने घेतला गळफास; कारण अस्पष्ट

Pune Airport : मर्यादित उड्डाणे तरीही पुणे विमानतळ ‘टॉप-20’मध्ये; आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये देशात 19 वे स्थान

56 वर्षांत मराठी चित्रपटाने ‘इफ्फी’मध्ये प्रथमच मारली बाजी; ‘गोंधळ’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

SCROLL FOR NEXT