cotton farming esakal
जळगाव

यंदा कपाशीचे क्षेत्र वाढणार...

चाळीसगाव तालुक्यात यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने बळीराजा हा सुखावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने बळीराजा हा सुखावला आहे. बळीराजाने खरिपाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीचे काम सुरू केले असले तरी गिरणा पट्ट्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे विहिरीला मुबलक पाणी आहे. अशा शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला देखील सुरवात केली आहे. तालुक्यात यावर्षी ६० हजार आठशे हेक्टरवर कपाशी लागवड होणार आहे. यासाठी कपाशी बियाणेच्या ३ लाख ४ हजार ३६० कपाशी बॅग बाजारात उपलब्ध झाल्या असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी नाही, अशा शेतकऱ्यांनी एक जूननंतरच कपाशी लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

चाळीसगाव तालुक्यात खरीप हंगामात लागवडीखाली क्षेत्र सुमारे ७८ हजार ३३९ हेक्टर असून, त्यात प्रामुख्याने प्रमुख कपाशी हे पीक आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात सुमारे ६० हजार ८७२ हेक्टर क्षेत्रावर पांढरे सोने अर्थात कपाशी लागवड होणार आहे. त्यासाठी यावर्षी ३ लाख ४ हजार ३६० बियाण्याचे पाकीट लागणार असून, बाजारात देखील उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती तालुका कृषी विभागाने दिली.

बागायती क्षेत्र वाढले

चाळीसगाव तालुक्यात ठिबक सिंचनद्वारे पाणी बचत होते. त्यामुळे बागायत क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र सध्या गिरणा परिसरात एकंदरीत दिसत आहे. विक्रेत्यांना कपाशी बियाण्याचे पाकिटे १५ मेपर्यंत प्राप्त झाली होती. मागील काही वर्षांपासून कापसावर मोठ्या प्रमाणावर बोंडआळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

मशागत अंतिम टप्प्यात

एक जूननंतरच बीटीचे बियाणे कृषी विभागाने नियोजन केले आहे. मात्र यावर्षी कपाशीच्या उत्पादनात घट झाली असली तरी भाव चांगला मिळाल्याने येत्या खरीपामध्ये शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कृषी विभागाकडून कपाशीच्या वाढीव क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आहे. मान्सूनही आठ ते दहा दिवस आधी धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून कृषी विभागानेही खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT