Counterfeit liquor case
Counterfeit liquor case sakal
जळगाव

बनावट मद्य प्रकरण : धारागिरातून आठ लाखांचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने धरणगावात बनावट मद्याच्या कारखान्यावर छापा टाकून अटक केलेल्या भूपेंद्र मराठे याने दिलेल्या माहितीवरून सचिन पाटीलच्या मुसक्या आवळल्या गेल्या. त्यानंतर धारागीर येथे छापा टाकून पावणेदोन लाखांच्या बनावट मद्यासह एक वाहन असा ८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या टोळीचा म्होरक्या अद्याप फरार आहे.(Counterfeit liquor case)

राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत अटक करण्यात आलेल्या सचिन पाटीलकडे या टोळीने तयार केलेल्या बनावट मद्याच्या वितरणाची जबाबदारी होती. भूपेंद्र मराठे (धरणगाव) याने दिलेल्या माहितीवरून धारागीर येथे प्लॉट एरियात जनावरांच्या गोठ्यातील कडब्याच्या गंजीमध्ये दडवलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीचे बनावट देशी दारूचे ५५ बॉक्स जप्त करण्यात आले. या दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी ६ लाखांची ट्रक (एमएच १८ एए ८६८४) जागेवरुन जप्त करण्यात आली.

सचिन पाटील याला पाळधी येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्याला धरणगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे, आनंद पाटील, जवान एन. व्ही. पाटील, ए. व्ही. गावंडे, एम. डी. पाटील, के. पी. सोनवणे, राहूल सोनवणे यांच्या पथकाने केली. जिल्ह्यातील ही मोठी कारवाई ठरल्याने या टोळीतील आणखी संशयित हाती लागण्याची शक्यता आता वाढली आहे.

फरारी आरोपी धुळ्यातील?

गुन्ह्यामध्ये सुरुवातीला ११ लाख २ हजार ४०० रुपये किमतीचा आणि काल पोलिस कोठडीतील आरोपीने दिलेल्या माहितीनंतर ७ लाख ७३ हजार ४०० असा १८ लाख ७५ हजार ८०० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीला स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, झाकणे आदी कच्चा माल पुरविणारा सहावा आरोपी मात्र फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. हा फरार आरोपी धुळ्यातील असावा, असा संशय आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT