fraud esakal
जळगाव

स्वस्त सोने खरेदीचे आमिष पडले महागात; दाम्पत्याला साडेचार लाखांचा चुना

खोदकामात सोन्याची माळ सापडल्याचा बहाणा करत नकली सोने विकले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील पिंप्राळा येथील रहिवासी तथा एम.जे.कॉलेजमध्ये शिपायी पदावर कार्यरत सुभाष रामदास लोखंडे (वय-५४) यांना अनोळखी भामट्यांनी ४लाख २० हजारांचा गंडा घातला आहे. खोदकामात सोन्याची माळ सापडल्याचा बहाणा करुन त्यांना नकली सोने विकून फसवणुक केल्याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील विश्वदिप कॉलनीतील सुभाष रामदास लाखंडे (वय, ५४) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. सेामवार (ता.१३) रोजी लोखंडे दाम्पत्य शहरातील बी.जे.मार्केट येथे खरेदीला गेले असतांना दुपारी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना गाठून चांदीचे नाणे दाखवले. खोदकामात आम्हाला हे सर्व सापडले असून अत्यल्प किंमतीत देण्याचे आमिष दाखवले तसेच सापडलेल्या सोन्यापैकी माळेतील एक मणी सराफाकडून तपासण्याचे सांगत दोघांच्या सोबत दिला. हा मणी घेवून लोखंडे दाम्पत्याने थेट सराफा दुकान गाठले. त्यांच्या तपासणीत हा मणी शुद्ध सोन्याचा असल्याचे सांगण्यात येताच त्यांचा विश्वास बसला. परिणामी त्यांनी चक्क ४ लाख २० हजार रुपयांचे सोनं खरेदी करण्याचा निर्णय घेत या अनोळखी भामट्यांना संपर्क केला. बोलणे झाल्यावर त्यापैकी एकाने देवाण-घेवाणीसाठी अंजिठा चौकात बोलावून घेतले. तेथून एका निर्जन स्थळावर घेवुन जात लोंखडे यांच्याकडून साडेचार लाख रुपये रोख घेवून त्यांना नकली सेाने देत पोबारा केला.


सोनार तोच..सोने मात्र नकली
लोखंडे यांनी ४लाख २० हजार रुपयांची रोकड देत त्या अनोळखी व्यक्तीकडून सोन्याची माळ घेतली. ही माळ घेवून मणी तपासुन देणाऱ्या सराफाच्या दुकानात सुभाष लोखंडे पत्नीसह दाखल झाले. सोन्याची माळ मोडण्यास आल्याचे सांगत ती सराफाच्या हातात दिली. कसोटीवर घासून बघताच ही माळ नकली असल्याचे सांगताच लोखंडे यांना धक्का बसला. तात्काळ त्यांनी जिल्‍हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. रात्री याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक मनोज पवार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT