जळगाव

कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने चाचणी करा

देविदास वाणी

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी ‘कोविड १९’ची कुठलीही लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने आरटीपीसीआर किंवा रॅपिड अॅन्टिजेन चाचणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पाठवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘निमा’, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांना केल्या आहेत. 

जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, की जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ६८ हजार ३६७ व्यक्तींची ‘कोविड १९’ तपासणी करण्यात आलेली असून, एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ७८ हजार ४७० एवढी आहे. सद्यःस्थितीत नऊ हजार ८७३ रुग्ण उपचार घेत असून, एकूण कोविड १९ रुग्णांपैकी एक हजार ५०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 


अनेक वेळा रुग्णांना इतर आजार व कोरोना यांची लक्षणे सारखीच असल्याने डॉक्टरांकडून पहिल्यांदा दोन दिवस साधारणत इलाज करण्यात येऊन नंतरही रुग्णाला बरे वाटले नाही तर मग कोरोनाची चाचणीचा सल्ला दिला जात असतो. तोपर्यंत रुग्णाचे आरोग्य अधिक खालावून त्याला कोरोनाची गंभीर लक्षणे जाणवतात. त्यामुळे लक्षणे जाणवताच संबंधित रुग्णाला तातडीने कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवावे, अशा सूचना देण्यात आल्या.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

समझो हो गया...! Smriti Mandhana ने एकदम स्टाईलमध्ये दाखवली एंगेजमेंट रिंग! जेमिमा रोड्रिग्सने शेअर केला Video

स्टार प्रवाहला आणखी एक धक्का? 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट? नव्या प्रोमोमुळे चर्चेला उधाण

Pune News : दौंड–इंदापूरमध्ये बनावट मद्याचा भंडाफोड; तीन लाखांचा साठा जप्त; तीन तरुणांना अटक!

SCROLL FOR NEXT