crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : युवतीवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय युवतीवर शेजारच्या विवाहित पुरुषाने अत्याचार केल्याची घटना घडली.()

पीडितेने पालकांना सांगितल्यांतर पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी ः

शहरालगतच्या ग्रामीण भागात १६ वर्षीय युवती कुटुंबीयांसह राहते. मंगळवारी (ता. १२) सकाळी दहाला शेजारच्या योगेश तेजमल पवार याने पीडितेच्या घरी येऊन तिला सांगितले, की तुला माझ्या पत्नीने घरी वरच्या मजल्यावर बोलावले आहे.

पीडिता संशयिताच्या घरी वरच्या मजल्यावर गेली असता संशयिताने तिच्यावर अत्याचार केला. भेदरलेल्या युवतीवर कुटुंबीयांचे लक्ष गेल्यावर त्यांनी चौकशी केली व अत्याचाराचा प्रकार समोर आला. त्यानंतर कुटुंबाने तातडीने युवतीसह एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले.

पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित योगेश पवार याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. युवतीवर अत्याचार झाल्याने ती गोंधळून गेली. घडल्या प्रकाराबाबत कुणाला सांगू नये, यासाठी संशयित योगेश पवार याने धमकावल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्याची कुणकुण लागताच तो फरारी झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. सी. मोरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT