जळगाव

गुन्हा करण्याच्या तयारीत आणि पोलिसांची सराईत गुन्हेगारावर झडप

अंगझडती घेतल्यावर त्याच्या कंबरेला पिस्तूल असल्याचे आढळून आले

सकाळ वृत्तसेवा



जळगाव : साधारण सहा वर्षापूर्वी शहरातील प्रजापतनगरात घडलेल्या खून (murdder) प्रकरणातील संशयित युनूस ऊर्फ सलीम सद्दाम पटेल याला शहर पोलिसांच्या (police) पथकाने खानदेश सेंट्रल येथून गावठी पिस्तूल (Pistol) आणि तीन जिवंत काडतुसांसह अटक (Arrest) केली आहे. खून खटल्यात निर्दोष सुटल्यापासून सद्दामच्या टोळीने जळगाव ते भुसावळ रेल्वेस्थानकावर बऱ्यापैकी अवैध व्यवसाय कब्जात केला आहे.


(jalgaon city police areest criminals gun confiscated)

शहरातील रेल्वेस्टेशन परिसराला लागूनच असलेल्या खानदेश सेंट्रल आवारात एक अट्टल गुन्हेगार कंबरेला पिस्तूल लावून दहशत माजवत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील अक्रम शेख, भास्कर ठाकरे, विजय निकुंभ, उमेश भांडरकर, किशोर निकुंभ, प्रणेश ठाकूर, गणेश पाटील, रतन गिते अशांनी रेल्वेस्थानक परिसर, गेंदालालमील आणि खानदेश सेंट्रल अशा वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून अखेर रिक्षात दडून बसला असताना युनूस ऊर्फ सद्दाम सलिम पटेल (वय-३०) याला शिताफीने ताब्यात घेतले. युनीसची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कंबरेला पिस्तूल असल्याचे आढळून आले. पिस्तूल काढल्यावर त्यात तीन राऊंड लोड होते. पिस्तुलासह सद्दामला ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.

टोळीसह खुनातील संशयित

शहरातील प्रजापतनगरात २३ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शकिल शेख इब्राहिम(वय ३०) हा तरुण शेतरस्त्याने बुलेटवर येत असताना त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून चॉपर, लोखंडी टायबर पट्टीसह इतर घातक शस्त्रानिशी पूर्वनियोजित हल्ला चढवून खून करण्यात आला होता. तालुका पोलिस ठाण्यात दाखल या खुनाच्या गुन्ह्यात शाहरुख ऊर्फ जुब्बा सलीम खाटीक, युनूस ऊर्फ सद्दाम सलीम पटेल, करण प्रकाश पवार, मुस्तफा मुबारक शेख, हर्षल वना महाजन, अशा पाच संशयितांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. न्यायालयात सरकारपक्ष आणि तत्कालीन तपासाधिकारी संशयितांवरील गुन्हा सिध्द करु शकले नाही. संशयाचा फायदा म्हणून खून खटला निर्दोष सुटला होता. याच खटल्यात खुनशी सद्दाम ऊर्फ सलीमने नव्याने रेल्वेतील टोळी उभी केल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT