जळगाव

कोरोनाचे नियम तोडल्याप्रकरणी काँग्रेस आमदारासंह, नेत्यांवर गुन्हे दाखल

भूषण श्रीखंडे

जळगाव : काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे (Congress state president Praniti Shinde) यांच्या तीन दिवसापूर्वी जळगाव येथे दौरा झाला ( Jalgaon Tour ) होता. यावेळी कोरोना नियमांचे (corona rule) उल्लंघन करून बैठक घेतल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार, नेत्यांसह सुमारे २५ जणांवर वर पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केले आहे.

( jalgaon congress mla leder corona rule break police fir police fir)

महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्‍या कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांचा तीन दिवसांपूर्वी जळगाव येथे दौरा झाला. यात अजिंठा विश्रामगृहात पक्षाची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. कोरोनामुळे संचार बंदी, राजकीय सभा, बैठक घेण्यास बंदी असतांना देखील यावेळी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात गर्दी विश्रामगृहात झाली होती.

राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांकडून उल्लंघन

देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच कोरोनाचे नियम राजकीय पदाधिकारी, नागरिकांनी मोडू नये असे विनंती केली आहे. परंतू महाविकास आघाडीमधील नेत्यांचे दौरे त्यात स्थानीक पदाधिकाऱ्यांकडून मोठी गर्दी करून कोरोनाचा संसर्ग पसरवित असल्याचे दिसत आहे.

पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

याबाबत आज नियमांचे कोरोनां नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात काँग्रेसचे आमदार, स्थानिक नेत्यांसह २० ते २५ जणांविरूध्द कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रावेरचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी अध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

( jalgaon congress mla leder corona rule break police fir police fir)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT