जळगाव

रिमांड होम मधून अल्पवयीन तरुण पळाला आणि सराईत चोरटा बनला 

रईस शेख

जळगाव ः स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चोपडा येथून अल्पवयीन विधीसंघर्षीत तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याने जळगासह, धुळे जिल्‍ह्‍यातून दुचाकी वाहने लंपास केली असून अनेक घरफोडंयाची कबुली दिली आहे. चौकशी अंती त्याला परत बालसुधारगृह (रिमांड होम) मध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्‍ह्‍यातील बाल सुधारगृहातून चोरीच्या गुन्ह्यातील विधीसघषींत बालकाने पळ काढला होता. या प्रकरणी मध्यप्रदेश पोलिसदलाचे दोन पोलिसांचे निलंबनही झाले होते. चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला हा संशयीत दुचाकी चोरीत पारंगत असून मध्यप्रेदशातुन पळ काढत त्याने चोपडा तालूक्यात बस्तान मांडले होते.

पथकाने असा घेतला शोध

गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी पोलिस नाईक अश्रफ शेख, इद्रीस पठाण, दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरी, दिपक शिंदे, भारत पाटिल अशांचे पथक तपासावर रवाना केले होते. पथकाने संशयीताला चोपडा तालूक्यातून चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याने एका मागून एक चार वाहने काढून दिली. त्यात धरणगाव, एरंडोल, शिरपुर, धुळे आदी ठिकाणी वाहने चोरुन आणल्याचे त्याने कबुल केले असून काही घरफोडीचे गुन्हेही कबुल केले. चौकशी अंती त्याला जळगावच्या बालसुधारगृहात दाखल करण्यात आले असून मध्यप्रदेश पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

अमृता खानविलकरला करायचंय 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम; म्हणाली- तिचं पात्र साकारणं हेच...

Vidhan Bhavan lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

'मेल्यानंतर तरी मला न्याय द्या' अभिनेत्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत केले गंभीर आरोप, जीवन मृत्यूंशी देतेय झुंज

Latest Marathi News Updates : उर्दू माध्यमाच्या शाळेची दुरावस्था

SCROLL FOR NEXT