जळगाव

वाळूमाफियांची मुजोरी; महिला आयएएस अधिकाऱ्याच्या पाळतीवर महाविद्यालयीन ‘विद्यार्थी’  

सचिन जोशी

जळगाव ः परिविक्षाधीन आयएएस प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पाळतीवर असलेल्या दोन तरुण विद्यार्थ्यांना जिल्‍हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांनी पाठलाग केल्याचे कबूल केले असून, एका वाळूमाफियाचे नावदेखील पोलिसांना सांगितल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याप्रकरणी पोलिसांत कुठलाच गुन्हा नोंद होऊ शकला नाही. 


जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदेवाईक आणि वाळूमाफियांची हिंमत कमालीची वाढली आहे. आर्थिक वर्षाखेर जवळ येत असून, महसुली अधिकाऱ्यांतर्फे कारवाई तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यात परिविक्षाधीन अधिकारी असल्यास त्यांचा कारवाईचा धडाकाच वेगळा असतो. परिणामी जळगाव शहरातील वाळूमाफियांनी महिला आयएएस अधिकाऱ्यावर चक्क महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसारखे दिसणारे तरुण पाळतीवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

तरुणांकडून पाठलाग..

प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे (आयएएस) यांना आपला पाठलाग केला जात असल्याची जाणीव झाली. निवासस्थानापासून पाठलाग करणारे तरुण कार्यालयातही पाळतीवर असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती कळवली. जिल्‍हापेठ पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतल्यावर चौकशी केली. त्या दोघांनी हे करण्यासाठी एका व्यावसायिकाचे नाव घेत पोलिसांकडे कबुली दिल्याचे वृत्त आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कुठलाच गुन्हा दाखल झालेला नव्हता. या तरुणांना ताब्यात घेतले होते, मात्र कॉलेजचे विद्यार्थी असल्याने आणि तक्रार नसल्याने समज देऊन सोडून दिल्याचे जिल्हापेठ पोलिसांनी सांगितले. 
 


मी घरातून निघाल्यापासून दोन जण पाठलाग करीत होते. ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत आले. मी पोलिसांना बोलावून त्यांना ताब्यात दिले आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल करणार आहे. 
- तृप्ती धोडमिसे, परिविक्षाधीन प्रांताधकारी 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT