Young man Accused Areest for 6 years  esakal
जळगाव

Crime Update : 6 वर्षे फरार संशयित अटकेत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार संशयित आरोपीला भडगाव तालुक्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुरनं ९७/२०१७ भादवि कलम ४२०, ४०६ अन्वये संशयित आरोपी भगवान भिकन ऊर्फ भिका सोनवणे (वय-३४ रा. पिंप्रीहाट ता. भडगाव ह.मु. महादेव डिंडोली ता.उधना, गुजरात) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.(Crime Update Suspect on run for 6 years arrested Jalgaon Crime News)

गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. संशयित भगवान हा बसने भडगाव येथे येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली.

त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, सुनील दामोदरे, लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, विनोद पाटील, प्रमोद ठाकूर यांनी कारवाई करत संशयित आरोपी भगवान सोनवणे याला पिंप्रीहाट बसस्थानक येथे बसमधून उतरताचा ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT