Crime News esakal
जळगाव

Crime Update : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून तिघांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील हरिविठ्ठल नगरात दारू पिण्यास पैसे न दिल्यावरून दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रामानंदनगर पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील शामनगर भागात अरुण कौतिक निंबाळकर (वय ५९) वास्तव्यास आहेत. सोमवार (ता.१७) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अरुण निंबाळकर हरिविठ्ठल नगर भागातील नवनाथ चौकाजवळ असताना त्यांना संदीप पाटील व भरत राठोड या दोघांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले.(Crime Update Three beaten up not paying for alcohol Jalgaon News)

त्यास नकार दिला असता, अरुण निंबाळकर यांना दोघांनी शिवीगाळ करत दगडाने तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. अरुण निंबाळकर यांचा बचाव करणाऱ्या शालक व त्याची पत्नी यांनाही संबंधितांनी मारहाण केली.

मारहाणीत तीन जण जखमी झाले आहेत. अरुण निंबाळकर यांच्या तक्रारीवरून संदीप पाटील व भरत राठोड (दोन्ही रा. नवनाथ नगर, जळगाव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT