Crime News esakal
जळगाव

Crime News : वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणावर चॉपरने हल्ला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवर जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून चॉपरने हल्ला केल्याची घटना नुकतीच शिरसोली रोडवर घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध शिरसोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील मेहरूण परिसरातील रहिवासी तुषार ईश्वर सोनवणे हा तरुण बुधवारी (ता. १२) रात्री मित्रासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीने जात होता. या वेळी सनी जाधव ऊर्फ फौजी, शुभम पाटील, सचिन ऊर्फ कोंडा, चेतन चौधरी ऊर्फ गोलू यांनी शिरसोली मार्गावरून जात असताना त्याला अडविले.(Crime Update Youth going to birthday attacked by chopper Jalgaon News)

यातील सनी ऊर्फ फौजी याने ‘माझ्यावर केलेली केस मागे घे..’ अशी धमकी दिली. तुषारने ‘कोर्टात केस सुरू असून, ती मागे घेणार नाही’ असे उत्तर दिल्याने त्याचा राग येऊन त्याचे वाईट वाटल्याने सनीने त्याच्या हातातील चॉपर काढून तुषारच्या हातावर वार केले. तसेच गोलू चौधरीने तुषारला फायटरने मारहाण केली.

सचिन ऊर्फ कोंडा व चेतन चौधरी याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याला जखमी केले. तुषारला तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून, चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नितीन पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT