Crime Update
Crime Update esakal
जळगाव

Jalgaon: वाढत्या गुन्हेगारीने तांबापुराचा ता(ण) पुरा बिघडला; गुन्हेगारांवरील वचक संपला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील मेहरूण परिसरातील तांबापुरा झोपडपट्टी तशी संमिश्र लोकवस्ती असलेले शहर वजा खेडच आहे. चारही टोकांना चार आणि मध्यभागी गुन्हेगारांमुळे आग धुमसत असते. मच्छी मार्केट, शिरसोली नाका विरुद्ध इच्छादेवी चौक अशा विविध गटांतील आपापसांतील हमरीतुमरीवरून दगडफेकीच्या घटनांसह दंगल हा तांबापुरावासीयांसाठी तसा किरकोळ विषय बनला आहे.

तांबापुरा येथील सिकलगरवाड्यात ऐन दिवाळीत दारासमोर फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २५) घडली. कुऱ्हाडी, कोयते, चाकू, तलवारींसह दोन गट एकमेकांवर चाल करून गेल्यानंतर शिरसोली रोड परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. दोन गटांतील तुंबळ हाणामारीत संजयसिंग प्रदीपसिंग टाक या तरुणाचा तलवारींनी भोसकल्यामुळे मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील इतर चौघे गंभीर जखमी झाले. एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद होऊन या प्रकरणातील संशयितांना अटकही करण्यात आली. मात्र, तांबापुरातील तणाव काही केल्या कमी होण्याचे नाव घेईना अशीच परिस्थिती आहे.(Criminal Increased in Tambapura Due to lack of consistency in police action deterrence of criminals ended Jalgaon Crime News)

सट्टा-जुगाराचे अड्डे

तांबापुरा परिसरात गल्लीबोळात सट्टा-जुगाराचे अड्डे चालविले जातात. इतकेच काय, तर चक्क एका पक्ष कार्यालयाचे फलक लावून सट्टापेढी चालविली जात असल्याचे काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले आहे. खदान परिसरातील कंजरवाड्यात पहाटे पाचपासून हातभट्टी दारूचे अड्डे लावून दारू पाडली जाते. जवळच गांजा विक्री होते. मेहरूण बगिचा, खदान परिसर असो की तांबापुरातील निमुळत्या गल्ल्या सहजासहजी गांजा, हातभट्टी दारूचे अड्डे दृष्टीस पडतात.

हातमजुरांच्या वस्तीतही राजकारण

सलग पाच महापौर देणारा तांबापुरा, मेहरूणच्या परिसरात वाढती गुन्हेगारी, सुविधांचा अभाव असला, तरी एकगठ्ठा व्होट बँक असल्याने तांबापुरा प्रत्येक पक्षाला आणि राजकारण्यांना हवा आहे. नगरसेवक असो की हांजी, हांजी करणारा कार्यकर्ता प्रत्येकाच्याच अंगात राजकारण ठासून भरले आहे. परिणामी जातीनिहाय गटातटाचे राजकारण शिगेला पोचले आहे. जेव्हा केव्हा दंगल, दगडफेकीची घटना घडली, येथील राजकीय पुढाऱ्यांकडूनच गुन्ह्यात अडकविण्यासाठीच्या याद्याच पोलिसांना पुरविल्या जातात. परिणामी एकेका दंगलीच्या गुन्ह्यात चक्क दीडदोनशे नावे सहज असतात, अशी चर्चा नेहमीच असते.

अवैध धंद्याचा पैसा

सट्टा, पत्ता, जुगारअड्डे चालविणारे आणि काही स्थानिक पुढारी गुंडांना पोसत असल्याने त्यांना पैसाही पुरविला जातो. परिणामी सामान्य रहिवासी मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब रहिवासी गुन्हेगारीच्या जात्यात भरडला जात असल्याची परिस्थिती आहे.

पोलिस खबरीच गुन्हेगार

गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असलेले गुंड, अवैध धंद्यात बरबटलेले अट्टल गुन्हेगारच पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क चालवत असतात. केव्हा कुणाला आत टाकायचे, कुणाला बाहेर काढयचे... कुणाची जिरवायची याचा निर्णय पोलिस मित्र किंवा राजकीय कायकर्ते असलेली हीच मंडळी ठरवत असल्याने किरकोळ वादाचेही दंगलीत सहज रूपांतर होते. परिणामी तांबापुराचा ‘ताणपुरा’ बिघडल्याची अवस्था असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ताज्या घटना

-१८ मे ः तांबापुरात दोन गटांत तुफान दगडफेक होऊन दंगल उसळली.

-१९ मे ः तांबापुरा दंगलीतील जमाव पोलिसांवर उलटला.

-१७ सप्टेंबर ः बिस्मिला चौकात घरासमोर तरुणाला मारहाण.

-३ ऑक्टोबर ः घरफोडीच्या प्रयत्नातील तिघा संशयितांना अटक.

-१० सप्टेंबर ः विठ्ठल नेरकर हा हद्दपार संशयित दहशत माजविताना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT