The rush to pay the house rent in the municipal corporation.  
जळगाव

Abhay Yojana: घरपट्टीमध्ये 64 हजारांमध्ये 24 हजारांची सूट; अभय शास्ती योजनेतील सहभागासाठी महापालिकेत गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Abhay Shasti Yojana: शहरातील घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय शास्ती योजना लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत रामेश्‍वर कॉलनीतील कोंडू फकिरा पवार यांच्याकडे ६४ हजारांची थकबाकी होती.

त्यांना व्याज व दंडाची २४ हजारांची सूट देण्यात आली. योजनेतील सहभागासाठी महापालिकेच्या कार्यालयात शहरवासीयांनी गर्दी केली होती. (Crowd in Municipal Corporation for participation in Abhay Shasti Yojana jalgaon news)

घरपट्टी थकबाकीदारांना रक्कम न भरल्याने घर लिलाव करण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र काही थकबाकीदारांनी आम्हांला घरपट्टी भरण्याची एक संधी द्यावी, अशी मागणी केली होती.

त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शेवटची संधी म्हणून थकबाकी भरणाऱ्यासाठी अभय शास्ती योजना लागू केली. योजनेत घरपट्टी भरणाऱ्यांना व्याज व दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३ कोटींहून अधिक जमा

योजना ४ डिसेंबरपासून लागू करण्यात आली असून ती १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. योजनेत सहभागी न होणाऱ्यांना कोणतीही सवलत न देता त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा महापालिकेच्या प्रशासनाने दिला आहे. योजनेला सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत तीन कोटी पाच लाख रुपयांचा भरणा शहरवासीयांनी केला आहे.

"अभय शास्ती योजनेचे शेवटचे ७ दिवस बाकी आहेत. थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेऊन आपली घरपट्टी कराची थकबाकी भरावी आणि लिलाव टाळावा." - गणेश चाटे, उपायुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT