Power cut
Power cut esakal
जळगाव

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा : MSEDCL सहव्यवस्थापकीय संचालक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : थकबाकीदारांनी थकीत व चालू वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, अन्यथा बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करावा, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या (MSEDCL) कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

श्री. डांगे यांनी जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलाची आढावा बैठक घेतली. तीत ते बोलत होते. जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार व नंदुरबार मंडलाचे अनिल बोरसे उपस्थित होते.

सहव्यवस्थापकीय संचालक डांगे म्हणाले, की महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीज खरेदी, पारेषण खर्च, तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यःस्थितीत कोट्यवधी रुपयांचे दायित्व आहे. दुसरीकडे महावितरणच्या वीजग्राहकांकडे थकबाकीचा मोठा डोंगर आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी दिले.

‘त्या’ एजन्सीवर कारवाई

ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या वीजबिल अचूक व वेळेत देण्यासाठी मीटर एजन्सी नेमल्या आहेत. या एजन्सींना मीटर रीडिंग घेताना फोटोंचा दर्जा सुधारण्यास व अचूक काम करण्यास सांगितले आहे. मात्र, कार्यक्षमता न सुधारल्यास संबंधित मीटर रीडिंग एजन्सींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी विविध विषयांचा आढावा घेऊन या महिन्यात वीजबिल वसुलीसह ग्राहकसेवा आणखी गतिमानतेने करण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: 'त्या' रात्री PDCC बँक सुरू ठेवणं मॅनेजरला भोवलं; निवडणूक आयोगाने घेतली मोठी अ‍ॅक्शन

MS Dhoni Fan : धोनीचा क्रेझी फॅन अचानक घुसला मैदानात... धरले ‘थला’चे पाय अन् पुढे...; व्हिडिओ व्हायरल

Narhari zirwal: झिरवाळांकडून महायुतीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या व्यासपीठावर हजेरी

Gold Import: सोन्याची आयात 2023-24 मध्ये 30 टक्क्यांनी वाढली; कोणता देश सर्वाधिक सोने खरेदी करतो?

Hanooman AI भारतात लाँच; 98 भाषांमध्ये काम करणार अ‍ॅप, असं करा डाऊनलोड

SCROLL FOR NEXT