Daily coupons for disabled people at GMC for train jalgaon sakal
जळगाव

रेल्वे सवलतीसाठी दिव्यांगांना ‘जीएमसी’त दररोज कूपन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतच्या कार्यवाहीसाठी दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी तारखेचे कूपन आगाऊ देण्यात येते

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतच्या कार्यवाहीसाठी दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी तारखेचे कूपन आगाऊ देण्यात येते. ज्या बांधवांना कुपन आवश्यक आहे, त्यांनी शासकीय कामकाजाच्या कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत कुपन घेण्यासाठी यावे, असे आवाहन रुग्णालयाच्या दिव्यांग बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

रुग्णालयात कोरोनाविरहित आजारांवर उपचार सुरू झाले आहे. त्यासोबत दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय तपासणी दर बुधवारी सकाळी नऊला सुरू होते. दिव्यांग बांधवांची गैरसोय थांबावी याकरिता आगाऊ बुकिंग कुपन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार हे कुपन शासकीय कामकाजाच्या कोणत्याही दिवशी मिळत असून कार्यालयीन वेळेतच घ्यायला यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक दिव्यांग बांधवाना रेल्वे सवलत प्रक्रिया करावयाची असते. त्याकरिता अनेक जण फक्त बुधवारीच येतात, असे निदर्शनास आले आहे. मात्र ही प्रक्रियादेखील सरकारी कामकाजाच्या कोणत्याही दिवशी केली जाते आहे. त्याचाही दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमाणपत्र मिळण्याबाबतची प्रक्रिया

दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणाची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून दिव्यांग मंडळातून कोणत्याही शासकीय कामकाजाच्या दिवशी जाऊन बुकिंग कुपन घ्यावे. कुपनावर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित उपचाराची कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लाभार्थ्यांनी सकाळी ९ वाजता वेळेवर उपस्थित राहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT