Dead female infant found in sewer jalgaon news  esakal
जळगाव

Jalgaon News: गटारात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक; गुन्हा दाखल

तालुक्यातील सावखेडासिम येथे गटारात स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील सावखेडासिम येथे गटारात स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे. यावल पोलिसांनी अर्भकास ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठविले आहे. (Dead female infant found in sewer jalgaon news)

सावखेडासिम (ता. यावल) गावात एका व्यक्तीला सोमवारी (ता.२५) गटारीत अपूर्ण दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक दिसले. त्यांनी तत्काळ गटारीतून अर्भक बाहेर काढून गावातील पोलिस पाटील पंकज बडगुजर यांना सांगितले.

याबाबत यावल पोलिसात दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असून, ते पाच ते सहा महिन्यांचे असावे, असा अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. हे संतापजनक कृत्य करणाऱ्या नराधमास किंवा त्या अज्ञात महिलेचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

दरम्यान, हा प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गावात सकाळी आठच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली असून, यावल पोलिस ठाण्यात माहिती कळविल्यावर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून तत्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलिस कर्मचारी राजेंद्र पवार यांनी सावखेडासिम येथे घटनास्थळी भेट देत मृत अर्भकास पंचमाना करीत ताब्यात घेतले. गावातील पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT