death  esakal
जळगाव

जळगाव : विजेचा धक्का लागून बांधकाम मजुराचा मृत्यू

याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जि. जळगाव) : शहरातील आगाखान वाडा येथे घराचे बांधकाम करणाऱ्या मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील आगाखान वाडा येथे अब्दुल सलाम शेख यांच्या घराचा बांधकाम ठेका नुरुउद्दीन शेख अलाउद्दीन शेख यांनी घेतलेला असून, बांधकामावर पाणी मारण्याचे काम इक्बाल सुपडू पिंजारी (वय २२) करीत असे. गुरुवारी (ता. २) सकाळी सव्वाआठच्या सुमारास नेहमीप्रमाणे इक्बाल सुपडू पिंजारी हा बांधकामावर पाणी मारायला गेला असता पाणी मारताना विजेचा धक्का लागून तो खाली पडला. त्याला घरमालक अब्दुल शेख यांनी भुसावळ येथील ट्रामा सेंटर येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. मृत इक्बाल पिंजारी हा यावल तालुक्यातील रहिवासी होता. मोलमजुरी करण्यासाठी तो भुसावळ येथे आलेला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT