crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दीपनगरला सुरक्षारक्षकांवर दगडफेक करून चोरी; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात साहित्याच्या चोरीसह दगडफेक करून दोघा सुरक्षारक्षकांना जखमी करणाऱ्या संशयित तीन अनोळखी हल्लेखोर तथा चोरट्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Deepnagar theft by throwing stones on security guards jalgaon crime news)

फेकरी रेल्वे क्रॉसिंगनजीक दीपनगर प्लांटकडून बुधवारी (ता.६) रात्री सव्वा दोन ते पावणे तीनच्या सुमारास भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या एमटी रॅकमध्ये कोणीतरी अज्ञात चोट्याने दीपनगर प्लांट परिसरातून रेल्वे वॅगनमध्ये नऊ लोखंडी साईट डोअर चोरी करून आणले होते.

त्या चोरीच्या लोखंडी ९ डोरकडे वीज केंद्राचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी अनिकेत काणेकर यांचे लक्ष गेले. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ते डोअर त्यांच्या ताब्यातील वाहनात लोड करून लागले. त्याच वेळी एक लाल काळ्या रंगाची विना क्रमांकाच्या पल्सरने तिघे अनोळखी इसम आले.

आलेल्या तिघांनी अंधारात सुरक्षा अधिकारी अनिकेत कानेकर व त्यांच्या साथीदारांवर दगडफेक सुरू केली. या झटापटीत दगडफेकीत जखमी दिलीप वराडे व राजेंद्र पाटील या दोघांचे मोबाईल त्यांनी हिसकवले. या घटनेप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CET Exam 2026: ‘सीईटी’चे प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर,पाहा कोणत्या दिवशी कोणती परीक्षा?

लग्नाच्या काही तास आधी अपघात, मुहूर्त चुकू नये रुग्णालयातच लग्नाचा निर्णय; कसा पार पडला सोहळा? पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : माहिमधील शाही वाडी परिसरात आग, अग्नीशामकाच्या 4 गाड्या दाखल

Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधनाच्या गालावर लागली सांगलीची हळद, फार्म हाऊसमधील लग्नाचे शाही व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं...

गडकरी साहेब पैसे पडून आहेत तर काम का होत नाही? नवले पुलावर स्थानिकांनी केला NHAIचा दशक्रियाविधी

SCROLL FOR NEXT