Sabgavan : Veterinary officer and villagers giving first aid to deer. esakal
जळगाव

Jalgaon News : विहिरीत पडलेल्या हरणांना मिळाले जीवदान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सबगव्हाण (ता. अमळनेर) येथे विहिरीत पडलेल्या दोन हरणांना ग्रामस्थांनी बाहेर काढत जीवनदान दिले असून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

सबगव्हाण येथील शेतकरी विलास नथ्थु पाटील यांच्या लोण पंचम शिवारातील विहिरीत दोन हरीण पडल्याची माहिती ग्रामस्थांना शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याने दिली. (deer that fell in well got life Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेत खाटेच्या सहाय्याने दोन्ही हरणांना बाहेर काढले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले.

वनपाल पी. जे. सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे यांनी भेट दिली असता, एका हरणाला तोंडाला व पायाला मार लागल्याने पशू वैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील यांना बोलवून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. शशीकांत पाटील, विनायक पाटील, सागर पाटील, चेतन पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT