WhatsApp crime
WhatsApp crime esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime : ‘Whatsapp’ Chattingद्वारे पोलिसांची बदनामी पडली महागात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शनिपेठेतील हाणामारीच्या बातमीचे कात्रण ‘भ्रष्टचार विरोधी मंच’ या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर टाकल्यानंतर पोलिस दलाची बदनामी होईल, अशी चॅटींग काहींनी सुरू केली. याप्रकरणी पोलिस कर्मचारीच फिर्यादी होऊन ग्रुप ॲडमिनसह चर्चेत सहभागी संशयितांविरुद्ध शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (defamation of police through Whatsapp Chatting case filed against admin with 6 members Latest Jalgaon crime News)

शनिपेठेत शिवाजीनगरातील तरुणाला ५-६ तरुणांनी विनाकारण मारहाण केली हेाती. दुपारी घडलेल्या घटनेत पोलिसांनी चार तरुणांना ताब्यातही घेतले. मात्र, याप्रकरणी कुणाची तक्रारच नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले. वृत्तपत्रात बातमी छापून आल्यानंतर मात्र चार तरुणांना समज देऊन प्रकरण मिटवण्यात आले.

नंतर रात्री दीडच्या सुमारास इस्लामपुरा भागात स्कूटीस्वार तिघांनी गोंधळ घातला. मात्र, रहिवाशांनी दगडफेक केल्याने वाहन सोडून तिघे पळून गेले. वारंवार घडणाऱ्या घटनांचे छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्या चौघा संशयितांना बोलावून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. रात्री दीडच्या घटनेत कुठलीच कारवाई न झाल्याचे वृत्त तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध झाले.

या बातमीचे कात्रण एकाने व्हॉटस्ॲप ग्रुपवर व्हायरल केले. भ्रष्टाचार विरेाधी मंच ग्रुपवर २७ सप्टेंबरला सकाळी ११.४७ ते १२.५१ दरम्यान झालेल्या चॅटींगवरून पोलिस दलास लक्ष करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिपेठचे पोलिस नाईक अभिजित सैंदाणे यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला.

काय होते चॅटींगमध्ये

‘भ्रष्टाचार विरोधी मंच’ व्हॉट्‌सॲप ग्रुपवर झालेल्या चर्चेत ‘हात तोडा १ लाख रुपये, पाय तोडा २ लाख रुपये, हाफ मर्डर करा ५ लाख रुपये, मर्डर करा १० लाख रुपये. मग पोलिस स्टेशन बंद करा.’ त्यावर अजून व्हॉटसॲप मोबाईल क्रमांक ९८९०६३४०३४ बिच में दलाल कोण है? पुन्हा ८०८७४४०९८७ याच क्रमांकावरून ‘बिचमें दलाल कोण है भाई’, अशी पोस्ट व्हायरल झाली. ॲडमीन क्रमांक १ ते ४ यांनी ग्रुप त्यांच्या नियंत्रणाखाली असतानाही पोस्ट व्हायरल होऊ दिली.

त्यातून पोलिस दलाची बदनामी झाल्याने फारुख कादरी (पूर्ण नाव माहीत नाही, ग्रुप ॲडमिन), सचिन धांडे (पूर्ण नाव माहीत नाही, ग्रुप ॲडमिन), ९२८४८४३५११ (मोबाईलधारक, पूर्ण नाव माहीत नाही, ग्रुप ॲडमिन), ९४०४५५९५१० (मोबाईलधारक, पूर्ण नाव माहीत नाही, ग्रुप ॲडमिन), शेख इरफान (पूर्ण नाव माहीत नाही), नाजीम (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT