crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अमळनेर, भुसावळमधील सराईत जिल्ह्यातून हद्दपार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ आणि अमळनेर (जि. जळगाव) येथील दोन सराईतांवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. (Deportation action has been taken against two criminals jalgaon crime news )

अजय ऊर्फ सोनू मोहन अवसरमोल (वय २४, रा.भारतनगर, भुसावळ) आणि तन्वीर शेख मुख्तार (वय २७, रा. जुना पारधीवाडा अमळनेर) अशी दोघा सराईतांची नावे आहेत.

अमळनेर शहरात तन्वीर शेख मुख्तार आणि भुसावळ शहरात अजय ऊर्फ सोनू मोहन अवसरमोल या दोघा सराईतावर बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे, अवैधरीत्या हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणे, वाळूची चोरी करणे यासह इतर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे.

जिल्हा हद्दपारीच्या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सोनू अवसरमोल यांच्याविरोधात तर अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी तन्वीर शेख मुख्तार याच्या विरोधात हद्दपारचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांना सादर केला होता.

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. श्री प्रसाद यांनी गुरुवारी (ता.१९) प्रस्तावाला मंजुरी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT