Jalgaon News  esakal
जळगाव

Jalgaon News : हद्दपार गुन्हेगारास अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात तलवार घेऊन दहशत माविणाऱ्या हद्दपार संशयिताला एमआयडीसी पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली.

पिन्या ऊर्फ दिनकर रोहिदास चव्हाण, असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे. (Deported criminal arrested Jalgaon News)

औद्योगीक वसाहतीजवळील सुप्रीम कॉलनीतील पिन्या ऊर्फ दिनकर रोहिदास चव्हाण (वय २२) याला प्रशासनाने शहरासह जिल्‍ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपारीचे आदेश झुगारत पिन्या ऊर्फ दिनकर चव्हाण सुप्रीम कॉलनीत तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यावरून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, किरण पाटील, नाना तायडे यांनी दिनकर ऊर्फ पिन्या यास सुप्रीम कॉलनीतील रामदेवबाबा मंदिराजवळ हेरले. त्याच्याजवळ धारदार तलवार आढळून आली. त्याला तलवारसह अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT