Finance Commission Fund esakal
जळगाव

Jalgaon News : उपमहापौरांनीच अधिक निधी आपल्या प्रभागात वापरला; पोकळेंचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात शासकीय निधीचा सर्वांत अधिक वापर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीच आपल्या प्रभागात केला असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी केला आहे. (deputy mayor used more funds in his ward Accusation of pokale jalgaon news)

शासनाकडून आलेल्या निधीचा असमतोल वाटप होत असल्याचा आरोप उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केला होता. याबाबत ॲड. पोकळे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शासनाकडून येणारा निधी केवळ दोन- चार नगरसेवकांच्या प्रभागातच वापरला जात आहे.

त्यामुळे निधी वाटपात मोठ्या प्रमाणात असमतोल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे, हे खरे असले, तरी खऱ्या अर्थाने शासकीय निधी सर्वांत जास्त उपमहापौर पाटील यांच्याच प्रभागात अधिक खर्च झाला आहे. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून आपल्या प्रभागात अधिक खर्च केला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आपण याबाबत महासभेत प्रश्‍नही उपस्थित केला होता. मात्र, आपल्याला त्याची ठोस माहिती देण्यात आलेली नाही. उपमहापौर पाटील यांनीच सर्व प्रभागाला न्याय दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी केलेला आरोप मागे घ्यावा, अशी मागणीही ॲड. पोकळे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT