Deputy Superintendent of Police Dhananjay Yerule saved lives of 3 jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : पोलिस उपअधीक्षक येरूळे ठरले ‘देवदूत’; वाचविले तिघांचे प्राण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील पोलिस उपअधीक्षक धनंजय येरूळे हे पाचोरा- जळगाव रस्त्यावर झालेल्या अपघातग्रस्त वाके परिवारासाठी अक्षरशः देवदूत ठरले.

त्यांनी गंभीर जखमी झालेल्या तिघांना आपल्या शासकीय वाहनातून तातडीने रुग्णालयात पोहोचवून तिघांना वेळेवर उपचार उपलब्ध करून दिले.

आता तिघांच्या प्रकृतीत सुधारणा असून, धनंजय येरूळे व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यामुळे पुनर्जन्म मिळाल्याची भावना जखमी वाके कुटुंबीयांनी व्यक्त केली. (Deputy Superintendent of Police Dhananjay Yerule saved lives of 3 jalgaon news)

जळगाव ते पाचोरा राष्ट्रीय महामार्गावरील नांद्रा- हडसन दरम्यानच्या रस्त्यावर दुसखेडा (ता. पाचोरा) येथील दिनेश वाके, आशा वाके व त्यांचा लहान मुलगा दुचाकीसमोर नीलगाय आल्याने अपघातग्रस्त झाले होते. गंभीर जखमी होऊन तिघे रस्त्यावर पडलेले होते.

याचवेळी उपअधीक्षक धनंजय येरूळे हे आपल्या शासकीय वाहनाने पाचोऱ्याकडे येत असताना त्यांना तिघे जखमी रस्त्यावर अपघातग्रस्त होऊन विव्हळत पडले असल्याचे दिसले. त्यांनी गाडी थांबवून अपघातग्रस्तांची विचारपूस केली. परंतु वाके कुटुंबीय बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

त्यांनी आपल्या शासकीय गाडीचे चालक पंकज मोरे व पोलिस कर्मचारी अजयसिंग राजपूत यांच्या मदतीने दिनेश वाके, आशा वाके व त्यांच्या लहान मुलास आपल्या शासकीय वाहनात टाकले. पाचोरा येथील पोलिस कर्मचारी राहुल बेहरे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन लगबगीने घटनास्थळी बोलावले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी येरूळे यांनी आपली शासकीय गाडी पाठवली व ते राहुल बेहरे यांच्या दुचाकीने पाचोरा येथे आले. दवाखान्यात जाऊन वाके कुटुंबीयांच्या उपचाराची पाहणी करून ते आपल्या निवासस्थानी परतले. रात्रीचा अंधार, पावसाची रिपरिप व तिघांना गंभीर इजा अशा परिस्थितीत कोण मदतीला येणार म्हणून आम्ही भयभीत होऊन देवाचा धावा करत असताना धनंजय येरूळे देवदूतासारखे धावून आले.

त्यांच्यासह त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे आम्हाला पुनर्जन्म मिळाला असून, दवाखान्यातून सुटका होताच येरूळे, राहुल बेहरे, अजयसिंग राजपूत व पंकज मोरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानणार असल्याचे जखमी वाके दांपत्याने स्पष्ट सांगितले व धनंजय येरुळे यांच्या मानवतावादी कार्याचे कौतुकही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT